Lokmat Sakhi >Food > Kurkure Chat Recipe : संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं? 'ही' घ्या कुरकुरे चाटची ५ मिनिट्स रेसिपी

Kurkure Chat Recipe : संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं? 'ही' घ्या कुरकुरे चाटची ५ मिनिट्स रेसिपी

Kurkure Chat Recipe : चहा, कॉफीसोबत नेहमीच बिस्किट्स खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं खावं जेणेकरून पोटही भरेल आणि मनही शांत राहील आणि शक्यतो घरचं हवं असं बरंच काही मनात येतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:33 PM2022-02-07T13:33:36+5:302022-02-07T13:58:24+5:30

Kurkure Chat Recipe : चहा, कॉफीसोबत नेहमीच बिस्किट्स खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं खावं जेणेकरून पोटही भरेल आणि मनही शांत राहील आणि शक्यतो घरचं हवं असं बरंच काही मनात येतं.

Kurkure Chat Recipe : Want something spicy with tea time, try this kukure chat | Kurkure Chat Recipe : संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं? 'ही' घ्या कुरकुरे चाटची ५ मिनिट्स रेसिपी

Kurkure Chat Recipe : संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं? 'ही' घ्या कुरकुरे चाटची ५ मिनिट्स रेसिपी

कुरकुरे आणि मुरमुरे यांची ही भेळ किंवा चाट म्हणा, सायंकाळच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय. असं मनात येतं की आता याक्षणी चाट खायला मिळालं असतं. मस्त चमचमीत भेळ किंवा रगडा पॅटीस तर.. मात्र अनेकदा तेवढा वेळ नसतो. बाहेर जाण्याचीही इच्छा नसते. सायंकाळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. चहा, कॉफीसोबत नेहमीच बिस्किट्स खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं खावं जेणेकरून पोटही भरेल आणि मनही शांत राहील आणि शक्यतो घरचं हवं असं बरंच काही मनात येतं.

त्यासाऱ्यावर उत्तम पर्याय म्हणजे कुरकुरे चाट. (kurkure chaat) एकदम कुरकुरीत चाटची ही रेसिपी. घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या पदार्थांपासून तुम्ही कुरकुरे चॅटची रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया सोपी, चविष्ट रेसिपी.

साहित्य

G2 कुरकुरे - 1 पॅक

पांढरे कुरमुरे- 1/2 कप

बारीक कापलेला कांदा - १

बारीक कापलेला टोमॅटो - १

बारीक कापलेली काकडी- १

बारीक कापलेल्या मिरच्या -२

टोमॅटो सॉस- २ चमचे

लिंबाचा रस- ४ चमचे

डाळिंबाचे दाणे- १/४ कप

चिरलेली कोथिंबीर - २ चमचे

कृती

सगळ्यात आधी G2 टँगी टोमॅटो कुरकुरे एका मोठ्या भांड्यात घ्या, त्यात कुरमुरे मिक्स करा

चिरलेला कांदा, टोमॅटो काकडी, हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्स करा.

वरील मिश्रणात आता डाळिंबाचे दाणे घाला.

मग टोमॅटो सॉस आणि लिंबाचा रस मिसळा.

यात तुम्हाला आणखी मसाला घालायची गरज नाही. कारण G2 टँगी टोमॅटो कुरकुरे चटपटीत चवीनं परिपूर्ण आहेत. सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर तयार आहे कुरकुरे चाट. खा, पोट भरेल.. मन नाही!

Web Title: Kurkure Chat Recipe : Want something spicy with tea time, try this kukure chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.