Join us  

कुरकुरीत भेंडी फ्रायची सोपी रेसिपी-एकदा ट्राय करा, भेंडीला नाक मुरडणारेही आवडीने खातील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 1:30 PM

Kurkuri Bhindi Recipe : क्रिस्पी भेंडीचे काप बनवणं फार सोपं आहे. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. अगदी कमीत कमी साहित्यात ५ ते १० मिनिटांत तयार होईल.

जेवणाला भेंडीची भाजी (Kurkuri Bhindi) आहे असं ऐकताच अनेकजण नाक मुरडतात तर काहींच्या घरात मोठी माणसंही भेंडी खायला मागत नाहीत. भेंडीची भाजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. (Crispy Bhindi Recipe in Marathi) कुरकुरीत भेंडी बनवली तर सगळेजण आवडीने खातील. क्रिस्पी भेंडीचे काप बनवणं फार सोपं आहे. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. अगदी कमीत कमी साहित्यात ५ ते १० मिनिटांत तयार होईल. (Crispy Bhendi Recipe) पाहूणे आल्यानंतरही तुम्ही त्यांना ही भाजी खायला देऊ शकता.  (Cooking Hacks)

कुरकुरीत भेंडी कशी करायची (How to make Crispy Bhindi) 

१) कुरकुरीत भेंडी करवण्यासाठी सगळ्यात आधी कोवळी भेंडी धुवून स्वच्छ पुसून घ्या.  भेंडी पुसून घेतल्यानंतर भेंडीचे सुरूवातीचे टोक काढून घ्या. नंतर भेंडी आडवी मधून २ भागात चिरून घ्या. आडव्या चिरलेल्या भेंडीचे उभे दोन भाग करून त्यातील बिया काढून टाका. नंतर पुन्हा भेंडी बारीक रेषांमध्ये उभ्या आकारात चिरा. 

२) भेंडीचे पातळ काप केल्यानंतर त्यात लिंबू घालून एकजीव करा. एका भांड्यात लाल मिरची पावडर, हळद, जीरं पावडर, धणे, पावडर, गरम मसाला, २ चमचे तांदूळाचे पीठ, ४ टिस्पून बेसनाचे पीठ घाला. हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. (यात मीठ घालू नका, नाहीतर भेंडीला पाणी सुटेल आणि क्रिस्पी होणार नाही म्हणून मीठ  शेवटी घाला)

हलवायासारखी खुसखुशीत बालूशाही घरीच करा; फक्त ३ वस्तूंनी बनेल परफेक्ट-रसरशीत बालूशाही

३) नंतर एका  मोठ्या ताटात किंवा वाडग्यात भेंडीचे पातळ काप घेऊन त्यात तयार पीठाचे मिश्रण घाला आणि पुन्हा एकजीव करून घ्या. त्यात लिंबू घालून पुन्हा एकत्र करा. यात १ ते २ टेबलस्पून पाणी घालून व्यवस्थित एकत्र करा. थोडे भेंडीचे काप बाजूला घेऊन त्यात मीठ घाला.  

चेहरा धुताना पाण्यात 'हा' १ पदार्थ मिसळा; कधीच टॅनिंग येणार नाही-टवटवीत, फ्रेश दिसेल चेहरा

४) कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात भेंडीचे काप घाला. हाय फ्लेमवर परफेक्ट होईपर्यंत तळून घ्या. भेंडी लालसर-कुरकुरीत झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या.  

५) उरलेल्या भेंडीच्या कापांमध्ये मीठ मिसळून भेंडी तेलात तळून घ्या. तयार आहे कुरकुरीत भेंडी. अशी भेंडी चविला उत्तम लागते. चपाती किंवा भाकरी बरोबर ही रेसपी तुम्ही ट्राय करू शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठीही   कुरकुरीत भेंडी उत्तम पर्याय आहे.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न