Join us  

हॉटेलवाले करतात तितका परफेक्ट लच्छा पराठा करण्याची पाहा १ सोपी ट्रिक, भरपूर पुडांचा खरपूस पराठा तय्यार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 1:36 PM

Laccha paratha | Easy way to make layered parotta | string paratha लच्छा पराठा जर नीट लाटता आला नाही तर तो लच्छा पराठाच नाही, त्यासाठी ही १ सोपी ट्रिक पाहा

वजन वाढण्याची समस्या लोकांमध्ये वाढत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी आपण आहारातून अनेक गोष्टी वगळतो. अनेकदा डाएटही मोडते. आवडता पदार्थ दिसल्यानंतर तो पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. आपण पंजाबी स्टाईल लच्छा पराठा नक्कीच ट्राय केला असेल. गरमा - गरम, मऊ - लुसलुशीत, अनेक पदरी असलेला लच्छा पराठ्यासोबत कोणतीही भाजी उत्कृष्ट लागते. पण त्यात मैद्याचा वापर होत असल्यामुळे काही लोकं लच्छा पराठा खाण्यास टाळतात.

आपल्याला जर लच्छा पराठा खायची इच्छा झाली असेल तर, गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा करून पाहा. हॉटेल स्टाईल लच्छा पराठा बनवणे काहींना कठीण जाते. पण जर आपण ही ट्रिक वापरली तर नक्कीच हा पदार्थ घरी परफेक्ट बनेल(Laccha paratha | Easy way to make layered parotta | string paratha).

गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

कसुरी मेथी

ओवा

भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग

मीठ

कोमट दूध

देशी तूप

तीळ

कोथिंबीर

या पद्धतीने करा परफेक्ट लच्छा पराठा

सर्वप्रथम, एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. त्यात कसुरी मेथी, ओवा आणि मीठ घालून मिक्स करा. साहित्य मिक्स झाल्यानंतर त्यात कोमट दूध घालून पीठ मळून घ्या. आता त्यात एक चमचा देशी तूप घालून पुन्हा मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर पिठाला ओल्या कपड्यात गुंडाळून १० मिनिटे झाकून ठेवा.

१० मिनिटे झाल्यानंतर मळलेल्या पिठावर १ चमचा तीळ, २ चमचे कोथिंबीर घालून हाताने सेट करा. दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. पिठाचा एक मोठा गोळा घ्या, त्याची पातळ चपाती लाटून घ्या, बोटाने किंवा चाकूने चपातीच्या मधून एक चीर पाडा. व त्याचा रोल तयार करा. वरचा भाग खालील बाजू ठेवा. व हाताने प्रेस करा. व त्यावरून पुन्हा लाटणं फिरवा. किंवा हाताने गोल आकार द्या.

‘बिन साखरेचे’ गोड आणि पौष्टिक लाडू खाल्ले आहेत कधी? खा भरपूर, गोड खाण्याचा गिल्ट विसरा

तयार पराठा तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. पराठा भाजत असताना शेगडीची फ्लेम मंद ठेवा. अशा प्रकारे पंजाबी स्टाईल लच्छा पराठा खाण्यासाठी रेडी.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स