लुसलुशीत पाव, शेंगदाण्याची तिखट चटणी आणि कुरकुरीत तळलेला गरम वडा म्हणजे अस्सल मुंंबईकराचा विक पॉइंट आहे. या अस्सल देशी फास्ट फूडची चर्चा केवळ मुंंबई, महाराष्ट्र किंंवा भारतापर्यंतच नसून जगात पसरलेली आहे. गरमागरम वडापावला खरी चव येते ती त्याच्यासोबत दिल्या जाणाऱ्या लाल सुक्या चटणी आणि तळलेल्या मिरच्यांमुळेच. वडापावची खरी मजा चटणीतच आहे. वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी तिखट चटणी वडापावची लज्जत आणखीनच वाढवते. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या ठेल्यावर वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी तिखट चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो. ही चटणी आपण बनवून घरी हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवू शकतो(vada pav chutney recipe).
आपण बरेचदा घरी रोजच्या जेवणाचा कंटाळा आला तर थोडा चेंज म्हणून वेगळे पदार्थ बनवून खातो. काहीवेळा तर वडापावची फर्माईश केली जाते. अशावेळी वडापावसोबत दिली जाणारी सुकी लाल चटणी (dry chutney recipe) देखील आपण हमखास बनवतो. परंतु घरी बनवलेली ही सुकी लाल चटणी वडापावच्या (Home Made Mumbai Vada Pav Chutney ) ठेल्यावर मिळणाऱ्या चटणीसारखी होत नाही. परंतु जर आपल्याला बाहेर वडापावच्या ठेल्यावर मिळणाऱ्या सुक्या लाल चटणी सारखीच चटणी घरी बनवायची असल्यास एक साधी सोपी रेसिपी लक्षात ठेवूयात. याचबरोबर यात एक सिक्रेट पदार्थ घातल्यास आपली चटणी हमखास वडापावच्या ठेल्यावर मिळते तशी बनेल( Dry Garlic Chutney Powder, Vada Pav Chutney).
साहित्य :-
१. बेसन - ३ ते ४ कप २. हळद - १/४ टेबलस्पून ३. मीठ - चवीनुसार ४. जिरे - १ टेबलस्पून ५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ६. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ८. तेल - ४ ते ५ टेबलस्पून (तळण्यासाठी)९. लसूण पाकळ्या - ७ ते ८
साजूक तुपाला बुरशी लागून खराब होऊ नये म्हणून ७ टिप्स, रवाळ, दाणेदार तूप टिकेल वर्षानुवर्षे...
चटणी बनवताना त्यात नेमका कोणता सिक्रेट पदार्थ घालावा ?
वडापावची खरी मजा ही चटणीत असते असंं म्हणतात. आपण वडे तळताना थोडं बेसन पिठाचं बॅटर तेलात तळून ते कुरकुरीत झाल्यावर चटणीमध्ये घालून वाटून घेतल्यास या लाल सुक्या चटणीची चव आणखीनच वाढते. याचबरोबर चटणीत थोडासा लिंंबाचा रससुद्धा घातल्याने चटणीला आणखीनच चव येते.
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद, पाणी घालून त्याची मध्यम कन्सिनस्टंसीची पेस्ट बनवून घ्यावी. २. त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये तेल घेऊन त्यात हे बेसनचे पीठ हाताने थोडे थोडे सोडून तळून घ्यावे.३. आता याच तेलात लसूण पाकळ्या घालून त्या २ ते ३ मिनिटे तळून घ्याव्यात.
गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...
४. एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यात जिरे, पांढरे तीळ, तळून घेतलेला लसूण घालून हे मिश्रण बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे. ५. त्यानंतर या मिश्रणात बेसनाचा तळून घेतलेला चुरा घालावा व पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्यावा. ६. आता या मिश्रणात काश्मिरी लाल मिरची पावडर व लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ घालून घ्यावे, पुन्हा एकदा मिक्सर फिरवून त्याची बारीक पूड करुन घ्यावी.
भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...
वडापाव सोबतची सुकी लाल चटणी खाण्यासाठी तयार आहे.