Join us  

महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 1:46 PM

How To Make Red Chili Chutney: जेवणात तोंडी लावायला किंवा मसाला म्हणून भाज्यांमध्ये टाकायला, अशा दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही हा ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा वापरू शकता. बघा हा झणझणीत ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी (Lal mirchicha thecha recipe in Marathi)...

ठळक मुद्देएखाद्या भाजीसाठी इंस्टंट मसाला म्हणूनही तुम्ही तो वापरू शकता. 

हिरव्या मिरच्यांचा ठेचा आपण नेहमीच करतो. ठेचा जेवणात तोंडी लावायला असला की जेवणाची रंगतच कशी वाढत जाते. काही जणं तर ठेचा- भाकरी आणि पिठलं असा बेत आवर्जून करतात. आता हिरव्या मिरच्यांचा ठेचा जसा चवदार लागतो, तसाच ओल्या लाल मिरच्यांचा ठेचाही झणझणीत होतो (How to make red chili chutney?). शिवाय तो एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवला तर अगदी महिनाभर सहज टिकतो. हा ठेचा तुम्ही जेवणात तोंडी लावायलाही घेऊ शकता किंवा मग एखाद्या भाजीमध्ये, वरणामध्येही मसाला किंवा तिखट टाकण्याऐवजी घालू शकता. यामुळे पदार्थाची चव नक्कीच खुलते (Instant Red chili chutney recipe). त्यामुळेच अशा दोन्ही गोष्टींसाठी उपयोगात येणाऱ्या आणि करायला अगदी सोप्या असणाऱ्या या ओल्या लाल मिरचीच्या झणझणीत ठेच्याची रेसिपी एकदा पाहून घ्या (Lal mirchicha thecha recipe in Marathi). 

 

लाल मिरचीचा ठेचा कसा करायचा?

साहित्य

२० ते २५ ओल्या लाल मिरच्या

लसूणच्या १० ते १५ पाकळ्या

हिवाळ्यात मॉईश्चरायझर, बॉडीलोशन, लिपबामवर खर्च करण्यापेक्षा ६ नैसर्गिक उपाय करा- त्वचा राहील मुलायम

एक इंच आल्याचा तुकडा

२ लिंबांचा रस

चवीनुसार मीठ

 

कृती

१. सगळ्यात आधी तर लाल मिरच्या स्वच्छ धुवून घ्या आणि कपड्याने पुसून पुर्णपणे कोरड्या करून घ्या. मिरच्यांची देठं काढून टाका.

२. यानंतर मिरच्या, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस आणि मीठ हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र करा आणि अगदी बारीक फिरवून त्याचा ठेचा करून घ्या.

झाडांना महिनोंमहिने फुलंच येत नाहीत? ४ पदार्थ वापरून करा खास उपाय, १५ दिवसांतच फुलांनी बहरेल बाग

३. हा ठेचा एखाद्या एअरटाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या.

४. हा ठेचा तुम्ही तसाही तोंडी लावायला घेऊ शकता किंवा मग जेवणासाठी जेवढा ठेचा पाहिजे तेवढा एखाद्या वाटीत काढायचा आणि त्यावर तेल- मोहरी- हिंग यांची फोडणी टाकून मग खायचा.

५. शिवाय एखाद्या भाजीसाठी इंस्टंट मसाला म्हणूनही तुम्ही तो वापरू शकता. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीमिरची