Join us  

तोंडाला चव आणणारा लसणाच्या पातीचा खमंग- झणझणीत ठेचा, फक्त ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2024 1:06 PM

How to Make Spring Garlic Chutney: हिरव्या मिरचीचा ठेचा आपण नेहमीच करतो. आता लसणाच्या कोवळ्या पातीचा ठेचा करून पाहा (Lasunachya paticha thecha recipe in marathi)..

ठळक मुद्देलसणाच्या पातीचा ठेचा करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे.मोजके पदार्थ वापरून हा ठेचा करता येतो आणि शिवाय तो अगदी झटपट होतो

हिरव्यागार मिरच्या आणि त्याच्या जोडीला लसणाचा खमंगपणा... असं मस्त कॉम्बिनेशन असणारा झणझणीत ठेचा जेवणात तोंडी लावायला असेल तर जेवणाची रंगत वाढते. साधंच जेवण असलं तरी ठेच्याच्या जोडीने ते कसं अगदी चवदार होतं आणि नकळतपणे आपण दोन- चार घास जास्तच खातो. तुम्हीही असे ठेचाप्रेमी, खवय्ये असाल तर एकदा लसणाच्या पातीचा खमंग आणि झणझणीत ठेचा करून पाहा (How to make spring garlic chutney). मोजके पदार्थ वापरून हा ठेचा करता येतो आणि शिवाय तो अगदी झटपट होतो (Lasunachya paticha thecha recipe in marathi)....

लसणाच्या पातीचा ठेचा करण्याची रेसिपी

 

साहित्य

एक मध्यम आकाराची वाटी भरून लसणाची पात

५ ते ६ हिरव्या मिरच्या

हिवाळ्यात खायलाच हवा बदामाचा शिरा, दुखणी जातील पळून- तब्येत होईल ठणठणीत, बघा रेसिपी

अर्ध्या लिंबाचा रस

चवीनुसार मीठ 

कृती

 

लसणाच्या पातीचा ठेचा करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे.

यासाठी सगळ्यात आधी लसूणाची पात स्वच्छ धुवून घ्या आणि ती थोडी चिरून घ्या.

हिवाळ्यातच सांधेदुखीचा त्रास का वाढतो? तज्ज्ञ सांगतात ५ मुख्य कारणं आणि त्यावरचे उपाय

यानंतर कढईमध्ये किंवा तव्यावर थोडं तेल टाका आणि त्यात मिरच्या चांगल्या खमंग परतून घ्या.

आता परतून घेतलेल्या मिरच्या आणि लसूणाची चिरलेली पात खलबत्त्यात घालून कुटून घ्या. 

खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये टाकूनही ठेचा करू शकता. 

आता या ठेच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, लिंबाचा रस पिळा आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की खमंग- झणझणीत ठेचा झाला तयार...

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती