Join us  

ढाबा स्टाईल लसूणी मेथी करा घरी, घ्या परफेक्ट रेसिपी; हिवाळ्यात गरम भाकरी- पोळीसोबत झकास बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 2:25 PM

Lasuni Methi Easy Recipe : नेहमी एकाच प्रकारची भाजी करुन आणि खाऊन कंटाळा आला तर ट्राय करा मेथीच्या भाजीची वेगळी रेसिपी

ठळक मुद्देमेथीची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा ढाबा स्टाईल लसूणी मेथी..थंडीच्या सिझनमध्ये करा परफेक्ट टेस्टी लसूणी मेथी, घ्या सोपी रेसिपी...

थंडीच्या दिवसांत बाजारात पालेभाज्या, फळभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या म्हणून आपण त्याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करतो. मेथी आरोग्यासाठी चांगली असल्याने आपण ती आवर्जून आणतो. मग कधी मेथीची परतून भाजी तर कधी मेथीचे पराठे केले जातात. कधीतरी जेवणात पातळ भाजी हवी असेल तर आपण डाळ-मेथीही करतो. पण हॉटेल किंवा ढाब्यावर मिळणारी लसूणी मेथी आपण घरी ट्राय करतोच असे नाही. गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत चविष्ट लागणारी ही लसूणी मेथी ट्राय करायची तर त्याची परफेक्ट रेसिपी माहिती असायला हवी. पाहूया ही चविष्ट रेसिपी झटपट करण्याची सोपी ट्रीक (Lasuni Methi Easy Recipe)....

साहित्य 

१. तेल - २ ते ३ चमचे 

२. जीरे - १ चमचा 

३. तीळ - १ चमचा 

४. बेसन - १ चमचा 

५. लाल मिरच्या - ३ ते ४ 

(Image : Google)

६. लसूण - ८ ते १० पाकळ्या

७. कांदा - १ 

८. टोमॅटो - १ 

९. दाण्याचा कूट - १ चमचा 

१०. मेथी - १ गड्डी 

११. गरम मसाला, तिखट, हळद - प्रत्येकी पाव चमचा

१२. मीठ - चवीनुसार 

कृती -

१. एका कढईमध्य तेल घालून त्यामध्ये जीरे आणि लसूण घाला. त्यानंतर निवडून धुतलेली मेथी घालून चांगले परतून घ्या. आता ही परतलेली मेथी एका बाजूला भांड्यात काढून ठेवा.

२. मिक्सरच्या भांड्यात दाण्याचा कूट, बेसन पीठ, तीळ आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करुन घ्या.

३. कढईत तेल घालून त्यामध्ये जीरे, लाल मिरची आणि बारीक चिरलेला लसूण घाला. 

४. यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन घाला आणि ३ ते ४ मिनीटे चांगले परतून घ्या. 

५. हे चांगले परतून झाले की त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घाला. त्यात हळद, तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून थोडे पाणी घालून एकसारखे करा. 

६. सगळ्यात शेवटी यामध्ये तेलात परतलेली मेथी घाला आणि सगळे चांगले एकजीव करुन घ्या. ५ मिनीटे सगळे चांगले परतून झाल्यावर ही गरमागरम भाजी भाकरी किंवा पोळीसोबत अतिशय छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.