Join us  

नीना गुप्ता यांची स्पेशल रेसिपी, दुधी भोपळ्याचं खमंग भरीत- रिंकी की मम्मी स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 12:48 PM

Food And Recipe: वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो आणि खातो. आता ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta special recipe) यांची ही खास रेसिपी बघा आणि दुधी भोपळ्याचं भरीत करून बघा.. एकदम स्पेशल! (lauki bharta)

ठळक मुद्देवांग्याच्या भरीताप्रमाणेच दुधी भोपळ्याचं भरीतही अगदी चवदार होतं. दुधी भोपळ्यामध्ये कॅलरी खूप कमी असतात. त्यामुळे हृदय विकार असणाऱ्यांसाठी तसेच वेटलॉस करणाऱ्यांसाठीही दुधी भोपळा खाणे फायद्याचे ठरते.

काही रेसिपी असतातच खास की ज्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. त्यापैकीच एक रेसिपी म्हणजे वांग्याचं भरीत. काही जणांना भरीत एवढं आवडतं की खमंग झणझणीत भरीत जेवणात असेल की भाकरी शिवाय दुसरं काहीच लागत  नाही. भरीत- भाकरी आणि तोंडी लावायला हिरव्या मिरचीचा ठेचा!! असं असलं की मस्त बेत जमून येतो. असाच झकास बेत  तुम्ही दुधी भोपळ्याच्या भरीतासोबतही करू शकता बरं का.. ऐकून जरा वेगळं वाटेल, पण हो, वांग्याच्या भरीताप्रमाणेच दुधी भोपळ्याचं भरीतही (Lauki Ka Bharta) अगदी चवदार होतं. दुधी भोपळ्याचं भरीत कसं करायचं, याची खास रेसिपी (special recipe) सांगितली आहे अभिनेत्री नीना गुप्ता यांनी. ही रेसिपी त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केली असून हा पदार्थ त्यांच्या अतिशय आवडीचा आहे, असंही त्या म्हणत आहेत.

 

दुधी भोपळा खाण्याचे फायदे (benefits of lauki)- दुधी भोपळ्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अशक्त व्यक्तींसाठी किंवा मोठ्या आजारातून नुकत्याच उठलेल्या व्यक्तींसाठी दुधी भोपळा खाणे फायद्याचे ठरते.- दुधी भोपळ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे हाडांचं दुखणं टाळण्यासाठी दुधी भोपळा खावा.- व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२ यांची कमतरता अनेक जणांना जाणवते. ही कमतरता भरून काढण्यासाठी दुधी भोपळा खावा.- प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत म्हणून दुधी भोपळा ओळखला जातो.- दुधी भोपळा हा पित्तनाशक आणि कफनाशक आहे. - दुधी भोपळ्यामध्ये कॅलरी खूप कमी असतात. त्यामुळे हृदय विकार असणाऱ्यांसाठी तसेच वेटलॉस करणाऱ्यांसाठीही दुधी भोपळा खाणे फायद्याचे ठरते. - कॉन्स्टीपेशनचा त्रास असेल तर आहारात नियमितपणे दुधी भोपळा खावा.

 

कसं करायचं दुधी भोपळ्याचं भरीत?१. यासाठी सगळ्यात आधी दुधी भोपळा दोन तुकड्यात कापून घ्या आणि गॅसवर ठेवून वांगं भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्या.२. व्यवस्थित भाजला गेल्यानंतर दुधी भोपळ्याची बाहेरची बाजू देखील वांग्याप्रमाणेच काळपट होते.३. आता भाजलेला भोपळा जेव्हा थंड होईल तेव्हा त्याची सालं काढून घ्या. भोपळा वांग्याप्रमाणे खूप मऊ होत नाही. त्यामुळे तो मिक्सरमध्ये फिरवून थोडा बारीक करून घ्या. 

४. एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल तापल्यानंतर फोडणी करा. त्यात लसूण आणि कांदा टाकून परतून घ्या.५. कांदा- लसूण परतून झाले की त्यात लाल मिरची आणि चिरलेला टोमॅटो टाका.६. टोमॅटो परतून झाला की त्यात भाजलेल्या दुधी भोपळ्याची पेस्ट टाका. चवीनुसार तिखट, मीठ, काळामसाला टाका आणि कढईवर झाकण ठेवून एखादा मिनिट वाफ येऊ द्या.७. भोपळा भाजलेला असल्याने खूप वाफ येऊ देण्याची गरज नाही. खमंग- झणझणीत दुधी भोपळ्याचं भरीत झालं तयार. पोळी किंवा भाकरीसोबत तुम्ही हे भरीत खाऊ शकता. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नीना गुप्ता