हिवाळ्याच्या दिवसांत खरपूस भाजलेल्या वांग्याचं खमंग- झणझणीत भरीत आणि त्याच्या जोडीला ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरी हा बेत म्हणजे आहाहा... खवय्यांसाठी पर्वणीच. त्यात तोंडी लावायला जर कांदा आणि ठेचा यांची साथ मिळाली तर मग जेवणाची मजा काही विचारायलाच नको. असाच मस्त बेत भोपळ्याच्या भरीतासोबतही जमून येऊ शकतो. त्यासाठीच बघा ही खास रेसिपी. दुधी भोपळ्याचं खमंग- चमचमीत भरीत (Lauki ka bharta recipe) कसं करायचं, याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Winter special recipe by Kunal Kapoor ) यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
दुधी भोपळ्याचं भरीत करण्याची रेसिपी
साहित्य
१. एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा
२. १ टेबलस्पून आलं- लसूण पेस्ट
३. २ ते ३ हिरव्या मिरच्या
४. लाल तिखट आणि मीठ चवीनुसार
५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर- डिझायनर काळी साडी, बघा स्वस्तात मस्त ३ पर्याय
५. मध्यम आकाराचा १ टोमॅटो बारीक चिरलेला.
६. १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
७. १ टेबलस्पून तेल
८. फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, हिंग.
९. ४ ते ५ लवंगा
कृती
१. सगळ्यात आधी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्या. त्याला चाकुने अधून- मधून बारीक छिद्र पाडा आणि त्यात लवंग खोचा.
मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन
२. दुधी भोपळ्याला बाहेरून तेल लावून घ्या आणि त्यानंतर तो गॅसवर ठेवून खरपूस भाजून घ्या.
३. त्यानंतर भाजलेला भोपळा एका भांड्यात ठेवा. आणि त्यावर झाकण ठेवून तो थंड होऊ द्या.
४. ५ ते १० मिनिटांनी भोपळ्यावरचं झाकण काढून तो स्वच्छ धुवून घ्या आणि वांग्याची साले काढतो, तशीच भोपळ्याची सालेही काढून टाका. आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
५. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल मोहरी, जिरे, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्या.
६. फोडणी झाल्यानंतर आलं- लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कांदा, टोमॅटो परतून घ्या. नंतर भाजलेल्या भोपळ्याच्या फोडी टाकून परतून घ्या. चवीनुसार लाल तिखट- मीठ टाकून झाकण ठेवून द्या आणि एक वाफ येऊ द्या. गरमागरम वाफाळतं भोपळ्याचं भरीत तयार.