दुधी भोपळा अतिशय आरोग्यदायी असतो त्यामुळे तो मुलांनी आणि घरातल्या सगळ्यांनी खावा, असं आपल्याला वाटतं. पण त्याची भाजी पाहताच अनेक जण नाक मुरडतात. अगदी ती भाजी त्यांना ताटातही नको असते. अशावेळी आपण त्याचे पराठे करतो. पण ते ही खूप आवडीने खाल्ले जात नाहीत. म्हणूनच आता दुधी भोपळ्याचे खमंग कुरकुरीत डोसे करून पाहा (how to make bottle gourd dosa). हा पदार्थ नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात देण्यासाठी अगदी उत्तम आहे (lauki ka dosa recipe). बघा कसे करायचे दुधी भोपळ्याचे कुरकुरीत डोसे... (dudhi bhoplyacha dosa recipe)
साहित्य
दुधी भोपळा चिरून त्याच्या बारीक केलेल्या फोडी अडीच कप
२ कप तांदळाचं पीठ
१ कप रवा
वजन वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? आहारतज्ज्ञ सांगतात, तूप खाऊन वजन घटवण्याचे २ उपाय
१ कप दही
१ कप बारीक चिरलेल्या तुमच्या आवडीच्या भाज्या
१ टीस्पून लसूण पेस्ट
एका हिरव्या मिरचीचे तुकडे
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी भोपळ्याच्या चिरलेल्या फोडी मिक्सरमध्ये टाका आणि त्याची पेस्ट तयार करून घ्या.
ही पेस्ट एका भांड्यात काढा. त्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, दही, चिरलेल्या भाज्या, लसूण पेस्ट, मिरच्या असं सगळे पदार्थ टाका.
पावसाळ्यात एक्झॉस्ट फॅन, किचनच्या टाईल्स खूपच चिकट होतात? पाहा तेलकटपणा घालविण्याचा सोपा उपाय
आता यामध्ये पाणी टाकून पीठ सैलसर भिजवून घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ टाका.
यानंतर नेहमीप्रमाणे करतो तसे त्याचे डोसे करा...
हा कुरकुरीत चवदार नाश्ता घरातल्या सगळ्यांनाच आवडेल.