दुधी भोपळा ( Bottle Gourd ) कितीही पौष्टिक असला तरी तो सगळ्यांनाच आवडतो असे नाही. लहान मुलेच काय पण बऱ्याचदा मोठी माणसेही दुधी भोपळ्याची भाजी पानात बघून नाके मुरडतात. अशावेळी मग आपण दुधी भोपळ्याचे पराठे करतो. आता पराठे, भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्याला दुधी भोपळ्याचे चविष्ट आणि पौष्टिक अप्पे (Lauki Ke Appe- Bhopalyache appe) करून बघा. मुलांना डब्यात देण्यासाठी देखील हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. शिवाय झटपट होणारा.( Healthy Breakfast Recipe)
कसे करायचे दुधी भोपळ्याचे अप्पे?साहित्यएक कप दुधी भोपळ्याच्या फोडी
एक कप रवा
पाव कप बेसन पीठ
अर्धा कप दही
लसूणाच्या ४ ते ५ पाकळ्या
थोडसं आलं आणि ३ ते ४ हिरव्या मिरच्या
आवडीनुसार कोथिंबीरचे प्रमाण घ्यावे
गाजर, कोबी, सिमला मिरची, कांदा या भाज्या. यात तुम्हाला आवडतील तशा भाज्या टाका किंवा यातल्या नको असतील त्या वगळा.
रेसिपीसगळ्यात आधी दुधी भोपळ्याची साले काढून घ्या आणि त्याच्या फोडी करून घ्या.
कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर अशा भाज्याही बारीक चिरून घ्या.
मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पाठ-कंबर आखडते? आलिया- करिनाची ट्रेनर सांगते ४ व्यायाम
आता दुधी भोपळ्याच्या फोडी, बेसन पीठ, रवा, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्या.
हे वाटण एका भांड्यात काढल्यानंतर त्याच्यात चिरलेल्या भाज्या टाका. या भाज्या तुम्ही कच्च्याही घेऊ शकता किंवा थोडसं तेल टाकून कढईत परतूनही घेऊ शकता. तुम्हाला जसे आवडेल तशा पद्धतीने घ्यावे.
आता दुधी भोपळ्याचे वाटण आणि या भाज्या छान एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ टाका आणि अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घालून सगळं मिश्रण हलवून घ्या.
आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर
नंतर अप्पेपात्र गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात थोडे थोडे तेल टाका. आणि आपण तयार केलेले पीठ त्यात घाला. नेहमीप्रमाणे जसे अप्पे करता तसे खालून- वरून छान वाफवून घ्या. दुधी भोपळ्याचे गरमागरम चविष्ट- पौष्टिक अप्पे तयार.