Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

Learn How To Make Perfect Shape Medu Vada बाहेरून कुरकुरीत - आतून सॉफ्ट, कमी तेल पिणाऱ्या मेदू वड्याची खास कृती, करा विकेंड स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 01:07 PM2023-05-05T13:07:43+5:302023-05-05T13:13:53+5:30

Learn How To Make Perfect Shape Medu Vada बाहेरून कुरकुरीत - आतून सॉफ्ट, कमी तेल पिणाऱ्या मेदू वड्याची खास कृती, करा विकेंड स्पेशल

Learn How To Make Perfect Shape Medu Vada | हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

दाक्षिणात्य पदार्थ आपल्याकडे चवीने खाल्ली जातात. इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा, डाळ वडा या रेसिपी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम मानले जातात. विकेंड जवळ आला की, आपल्याला काहीतरी हटके पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण घरच्या घरी मेदू वडा ही रेसिपी ट्राय करू शकता. घरी तयार केलेले मेदू वडे खाणे केव्हाही उत्तम, कारण मेदू वडा तळण्यासाठी आपण घरगुती तेलाचा वापर करतो. व स्वच्छतेची देखील काळजी घेतो.

मेदू वडा करताना एक चूक मात्र, आपल्याकडून हमखास घडते. काही वेळेला मेदू वडा गोल आकाराचे बनत नाही. हातावर पीठ घेतल्यानंतर तेलात तळण्यासाठी सोडताना त्याचा आकार बिघडतो. किंवा हाताला तेलाचे चटके बसतात. यासाठी आपण एक ट्रिकचा वापर करू शकतो. या ट्रिकमुळे गोल आकारचे परफेक्ट अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचे मेदू वडे घरच्या घरी तयार होतील(Learn How To Make Perfect Shape Medu Vada).

मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

मीठ

हिंग

जिरं

आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट

आलं

हिरवी मिरची

कडीपत्ता

तांदळाचं पीठ

तेल

पाणी

या पद्धतीने करा परफेक्ट मेदू वडे

सर्वप्रथम, एक कप उडीद डाळीमध्ये पाणी घालून, ३ तासांसाठी किंवा रात्रभर भिजत ठेवा. उडीद डाळ भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. व त्याची बारीक गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या. उडीद डाळीची बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर, एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्या पेस्टमध्ये मीठ, हिंग, जिरं, बारीक चिरलेला आलं, हिरवी मिरची व कडीपत्ता घालून मिश्रण मिक्स करा.

२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा तेल व एक चमचा पाणी घालून मिश्रण हाताने चांगले एकजीव करा. मिश्रणाला हाताने सतत ढवळत राहा, जेणेकरून मिश्रण चांगले फ्लफी व मऊ होईल.

आता पळी किंवा झाऱ्याला पाण्यात बुडवून घ्या, व त्यावर मेदू वड्याचे तयार पीठ गोल आकारामध्ये ठेवा, व त्याला मेदू वड्याचा आकार द्या. दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात झाऱ्यावर तयार गोल आकाराचे मेदू वडे सोडा. व दोन्ही बाजूने मिडीयम फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी मेदू वडा खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसह खाऊ शकता. 

Web Title: Learn How To Make Perfect Shape Medu Vada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.