सायंकाळी कधी जास्त भूक लागत नाही, किंवा बाहेर खाणे झाले तर, पोळी उरते. मग शिळी पोळी (Leftover Chapati) उरली की आपण ती पुन्हा गरम करून चहासोबत खातो. काही वेळेला उरलेली पोळी कडक होते, ज्यामुळे बरेच जण पोळी खाणं टाळतात. पण जास्त पोळ्या उरल्या असतील तर, अन्न टाकणे हे उचित वाटत नाही. अनेकदा घरातील गृहिणी एक्स्ट्रा पोळ्या तयार करतात. ज्यामुळे पोळ्या सकाळी उरतात. उरलेल्या पोळ्यांचं करायचं काय? जर आपल्यालाही असा प्रश्न पडला असेल तर, फोडणीची पोळी (Chapati Chivda) तयार करून पाहा.
पौष्टीक आणि हटके अशी ही रेसिपी करायला तर सोपी आहेच, शिवाय चवीलाही भन्नाटचं लागते (Cooking Tips). जर सकाळच्या नाश्त्याला पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर, उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा करून फोडणी द्या. चला तर मग फोडणीची पोळी कशी तयार करायची पाहूयात(Leftover chapati chivda authentic Recipe).
फोडणीची पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य
उरलेली पोळी
शेंगदाणे
तेल
जिरं
कडीपत्ता
हिरवी मिरची
कांदा चिरण्याची ही युनिक ट्रिक पाहिली का? सुरीचा वापर न करता, डोळ्यात पाणी न आणता चिरा बारीक कांदा
कांदा
साखर
मीठ
लिंबाचा रस
हळद
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पोळीचे तुकडे घालून बारीक खडबडीत वाटून घ्या. पोळ्यांचा कुस्करा एका बाऊलमध्ये काढून घ्या. एका पॅनमध्ये २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मुठभर शेंगदाणे घालून तळून घ्या. तळलेले शेंगदाणे एका वाटीत काढून घ्या. नंतर त्यात एक चमचा जिरं, ४ ते ५ कडीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस, तळलेले शेंगदाणे आणि चिमुटभर हळद घालून साहित्य भाजून घ्या.
मुठभर मुरमुरे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पचन सुधारेल-वजनही होईल कमी, हाडांना मिळेल बळकटी
कांदा लालसर झाल्यानंतर त्यात पोळ्यांचा कुस्करा घालून मिक्स करा. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे चविष्ट फोडणीची पोळी खाण्यासाठी रेडी.