रोजच्या जेवणासाठी आपण चपात्या करतो. परंतु काहीवेळा या चपात्या जास्तीच्या केल्या जातात आणि त्या उरतात. अशा उरलेल्या चपात्या शिळ्या होऊन कडक होतात. अशा शिळ्या चपात्या दुसऱ्या दिवशी खायला कुणालाच आवडत नाही. उरलेल्या चपातीचे नेमके करायचे काय असा प्रश गृहिणींना पडतो. अशावेळी आपण या उरलेल्या चपात्यांपासून नाश्त्याला (Quick & Easy Chapati Chinese Bhel Recipe) खाता येतील असे अनेक पदार्थ तयार करतो. या पदार्थांमध्ये आपण चपातीचा लाडू, फोडणीची चपाती, चपातीचा चिवडा असे अनेक पदार्थ करुन खातो. जर आपल्याला उरलेल्या चपातीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तर आपण काहीतरी नवीन वेगळा पदार्थ नक्की ट्राय करुन पाहू शकतो(Leftover Chapati Recipe Chinese Bhel).
उरलेल्या चपातीपासून आपण मुलांसाठी हेल्दी झटपट होणारी चायनीज भेळ (Leftover Roti Chinese Bhel Recipe) तयार करु शकता. लहान मुलांना मस्त चटपटीत, चायनीज पदार्थ खायला खूपच आवडतात. परंतु चायनीज पदार्थांमधील सॉस आणि इतर पदार्थांमध्ये हानिकारक रंग, प्रिझर्वेटिव्ह्ज आणि अजिनोमोटो असते. यामुळे मुलांना बाहेरचे चायनीज पदार्थ खायला न देता आपण झटपट घरच्या घरीच उरलेल्या चपातीपासून चायनीज भेळ तयार करु शकतो. उरलेल्या चपातीपासून हेल्दी चायनीज भेळ कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Leftover Chapati Chinese Bhel).
साहित्य :-
१. उरलेल्या चपात्या - ४ ते ५
२. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेल)
२. लसूण - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
३. कांदा - १/२ काप (उभा चिरलेला)
४. गाजर - १/२ काप (उभे चिरलेले)
५. भोपळी मिरची - १/२ काप (उभी चिरलेली)
६. कोबी - १/२ काप (उभा चिरलेला)
७. शेजवान सॉस - १ टेबलस्पून
८. सोया सॉस - १ टेबलस्पून
९. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
१०. मीठ - चवीनुसार
११. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोला बटाटे झटपट
कृती :-
१. सगळ्यात आधी उरलेल्या चपात्या एकावर एक ठेवून त्याचा एकत्रित गोल रोल करून घ्यावा. आता सुरीच्या मदतीने या चपातीचा रोल आडवा ठेवून त्याचे बारीक लांब न्युडल्स सारखे लांब लांब काप कापून घ्यावेत.
२. पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात हे चपातीचे तुकडे हलकेच परतून घ्यावेत. यामुळे हे चपातीचे तुकडे थोडे क्रिस्पी होतील.
३. आता हे चपातीचे तुकडे एका वेगळ्या बाऊमलध्ये काढून घ्यावेत.
ऐन थंडीत करा पिवळ्या धम्मक मक्याचे पराठे, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-एक काय चार खा बिंधास्त!
४. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेले आलं लसूण घालून हलका सोनेरी रंग येईपर्यँत परतून घ्यावे.
५. आता यात आपल्या आवडीप्रमाणे गाजर, कांदा, भोपळी मिरची, कोबी घालून या भाज्या परतून घ्याव्यात. त्यानंतर यात शेजवान सॉस, सोया सॉस, काळीमिरी पूड व चवीनुसार मीठ घालावे. हे भाज्यांचे मिश्रण २ ते ३ मिनिटे परतून घ्यावे.
६. सगळ्यात शेवटी गॅस बंद करून यात चपातीचे तुकडे घालावेत, आणि चमच्याने सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावे.
उरलेल्या चपातीची झटपट तयार होणारी हेल्दी चायनीज भेळ खाण्यासाठी तयार आहे.