Join us  

शिळी चपाती आणि उकडलेला बटाटा, ‘असा’ क्रिस्पी-कुरकुरीत चपाती रोल, चमचमीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2023 6:00 PM

Leftover chapati roll with Potatoes | Indian veg roll for Breakfast : शिळ्या चपात्यांचं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर करुन पाहा हा रोल

नाश्ता म्हटलं की पोहा, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खाल्लेच जातात. पण रात्रीचं जेवण शिल्लक राहिल्यावर करायचं काय असा प्रश्न पडतो. प्रत्येक घरात रात्रीची चपाती किंवा भात शिल्लक राहतोच. मग उरलेल्या पोळ्यांचं आपण चिवडा किंवा लाडू तयार करतो. पण हेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल. किंवा शिळ्या चपातीचं काही तरी नवीन ट्राय करून खायचं असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

आपण २ उकडलेले बटाटे आणि शिळ्या चपातीचा क्रिस्पी रोल तयार करू शकता. हे रोल्स आपण मुलांच्या टिफिनसाठी तयार करून देऊ शकता. किंवा सायंकाळी चहासोबतही खाऊ शकता. चला तर मग शिळ्या चपातीचा क्रिस्पी रोल कसा तयार करायचा पाहूयात(Leftover chapati roll with Potatoes | Indian veg roll for Breakfast).

शिळ्या चपातीचा क्रिस्पी रोल करण्यासाठी लागणारं साहित्य

शिळी चपाती

मीठ

लाल तिखट

कोथिंबीर

बटाटे

पालेभाज्या सुकतात-सफरचंद काळी पडतात? लिंबाच्या रसाचा एक सोपा उपाय, काही मिनिटात दिसतील फ्रेश

धणे पूड

गरम मसाला

हिरवी मिरची

कांदा

चाट मसाला

गव्हाचं पीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, चपातीचा रोल तयार करून बारीक पण लांब आकारामध्ये चिरून घ्या. चपाती चिरून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट व चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. मग त्यावर हाताने पाणी शिंपडा. जेणेकरून कडक झालेली चपाती मऊ होईल. नंतर त्यात ३ चमचे कॉर्न फ्लोर व १ चमचा तांदुळाचं पीठ घालून हाताने मिक्स करा.

दुसऱ्या बाऊलमध्ये २ उकडलेले बटाटे घेऊन मॅश करून घ्या. नंतर त्यात एक चमचा धणे पूड, एक चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हाताने साहित्य एकजीव करा. आता हातावर थोडं तेल लावून घ्या, व बटाट्याच्या मिश्रणाचा रोल तयार करून घ्या.

हात न लावता पीठ मळता येते? एक ट्रिक-२ मिनिटात पीठ मळण्याची सुपरफास्ट पद्धत

एका बाऊलमध्ये २ चमचे गव्हाचं पीठ घ्या. त्यात पाणी, चवीनुसार मीठ मिक्स करून पेस्ट तयार करा. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. बटाट्याच्या मिश्रणाचा रोल घ्या, व हा रोल गव्हाच्या पिठाच्या पेस्टमध्ये बुडवून घ्या. नंतर चिरून घेतलेली शिळी चपाती रोलवर चिटकवा. व गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे शिळ्या चपातीचा क्रिस्पी रोल खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स