आदल्या दिवशीचा किंवा सकाळचा भात शिल्लक राहिला असेल तर अनेकदा या भात फोडणीला देऊन फोडणीचा भात बनवला जातो. (Crispy Dosa Recipe) पण डाळ उरली असेल तर अनेकजण ही डाळ फेकून देतात. उरलेलं वरण टाकून देण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी साहित्यात कुरकुरीत डोसा बनवू शकता. (Cooking Hacks) डाळींचे भाव नेहमीच गगनाला भिडलेले असतात, अशाच शिल्लक राहिलेली डाळ फेकून देणं पटतं नाही. ताज्या भाताबरोबर शिळं वरण खायलाही अनेकांना आवडत नाही. (Leftover dal crispy dosa recipe)
डाळीत प्रोटीन्स, व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे डाळ टाकून देण्यापेक्षा त्याची सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. (Dal Dosa Recipe) नाश्त्याला डोसा खायला सर्वांनाच आवडतो. टोमॅटोची किंवा नारळाची चटणी डोश्याबरोबर खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला आंबवण्याची, डाळ भिजवण्याची, दळण्याची कोणतीच कृती करावी लागणार नाही. एकदम कमी वेळात झटपट बनून तयार होईल. वरणाचा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.
वरणाचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य (Dosa From Leftover Dal)
१) उरलेली डाळ- १ ते २ वाटी
२) दही- १ वाटी
३) बारीक रवा - १ वाटी
४) लाल तिखट- १ टिस्पून
५) मीठ- चवीनुसार
६) बेकींग सोडा - चिमुटभर
७) पाणी- गरजेनुसार
शिल्लक राहिलेल्या वरणाचा डोसा करण्याची कृती (How to Make Dosa From Leftover Dal)
1) सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात उरलेलं वरण काढून घ्या. त्यात १ वाटी दही आणि १ वाटी रवा घाला. त्यात थोडं पाणी घालून वाटून घ्या.
२) त्यात थोडं मीठ, खाण्याचा सोडा घालून एकजीव करा. चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकत्र करून घ्या. पॅनला तेल लावून तेल गरम झाल्यानंतर त्यात गोलाकार डोश्याचे पीठ घाला.
३) डोसा शिजत असताना गरजेनुसार तेल घाला. डोसा एका बाजूने व्यवस्थित शिजल्यानंतर दुसऱ्या बाजून उलटून घ्या.
४) डोसा पूर्ण शिजल्यानंतर त्यावर तेल आणि लाल तिखट घालून फोल्ड करा आणि खाली काढून घ्या. तयार डोसा तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस, शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता..