उरलेल्या शिळ्या भाताचं काय करायचं असा प्रश्न कायम पडतो. फोडणीचा भात नेहमीच उरलेल्या भातापासून बनवला जातो. पण काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर तुम्ही शिळा भात वापरून खमंग नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता. भातापासून अप्पे तयार करणं खूपच सोपं आहे. (Cooking Hacks) यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. (leftover rice appe recipe) सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणातही चटणी किंवा सांबारबरोबर तुम्ही हे अप्पे खाऊ शकता. (How to make appe from leftover rice)
भाताचे इंस्टंट अप्पे बनवण्याची रेसेपी
भाताचे अप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी भातात थोडं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्या. यात १ वाटी रवा, १ चमचा दही घालून हे मिश्रण एकजीव करा. १० मिनिटं हे मिश्रण झाकून तसंच राहू द्या. नंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, चिली फ्लेक्स, ऑर्गेनो, मीठ घालून मिश्रण एकजीव करा. अप्प्याच्या भांड्याला तेल लावून घ्या ते गरम झाल्यानंतर त्यात तयार मिश्रण घालून अप्पे शिजवून घ्या. १० मिनिटांनी गॅस बंद करा. तयार आहेत गरमागरम भाताचे इंस्टंट अप्पे