Lokmat Sakhi >Food > रात्रीचा डाळ - भात उरला ? १५ मिनिटांत करा सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत धिरडं, घ्या सोपी रेसिपी...

रात्रीचा डाळ - भात उरला ? १५ मिनिटांत करा सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत धिरडं, घ्या सोपी रेसिपी...

Leftover Rice & Dal Chilla : Leftover Rice & Dal Recipe : Don't Waste Leftover Rice & Dal Make This Snacks Recipe For Morning Breakfast : डाळ - भात शिल्लक राहिल्यास, करा झटपट गरमागरम धिरडं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 16:06 IST2025-01-10T16:06:06+5:302025-01-10T16:06:58+5:30

Leftover Rice & Dal Chilla : Leftover Rice & Dal Recipe : Don't Waste Leftover Rice & Dal Make This Snacks Recipe For Morning Breakfast : डाळ - भात शिल्लक राहिल्यास, करा झटपट गरमागरम धिरडं...

Leftover Rice & Dal Chilla Leftover Rice & Dal Recipe Don't Waste Leftover Rice & Dal Make This Snacks Recipe For Morning Breakfast | रात्रीचा डाळ - भात उरला ? १५ मिनिटांत करा सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत धिरडं, घ्या सोपी रेसिपी...

रात्रीचा डाळ - भात उरला ? १५ मिनिटांत करा सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत धिरडं, घ्या सोपी रेसिपी...

काहीवेळा रात्रीच्या जेवणातील डाळ - भात जास्तीचा केला की उरतोच. असा उरलेला डाळ - भात (Leftover Rice & Dal Recipe) आपण दुसऱ्या दिवशी खायचा कंटाळा करतो किंवा असा उरलेला (Leftover Rice & Dal Chilla) डाळ - भात दुसऱ्या दिवशी खाणे अनेकांना आवडत नाही. अशावेळी या उरलेल्या डाळ - भातापासून आपण अनेक पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन तयार करु शकतो(Don't Waste Leftover Rice & Dal Make This Snacks Recipe For Morning Breakfast).

शक्यतो, रात्रीचा डाळ - भात उरला की आपण फोडणीचा भातच करतो आणि उरलेल्या डाळीसोबत खातो. परंतु जर तुम्हाला आदल्या दिवशी उरलेला डाळ - भात खायचा नसेल तर आपण सकाळच्या ब्रेकफास्टसाठी मस्त झटपट तयार होणारे पौष्टिक असे धिरडे तयार करु शकतो. अगदी कमी साहित्यात पटकन तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ घरातील सगळ्यांनाच खूप आवडेल. जर रात्रीचा डाळ - भात शिल्लक राहिला असेल तर ते अन्नपदार्थ फेकून न देता किंवा नेहमीचाच फोडणीचा भात न करता काहीतरी वेगळा असा खास पौष्टिक पदार्थ झटपट तयार करु शकतो. उरलेल्या डाळ - भाताचे हेल्दी धिरडे तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. उरलेली डाळ - १ कप 
२. उरलेला भात - १ कप 
३. गरम मसाला - १ टेबलस्पून 
४. हळद - १/४ टेबलस्पून 
५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
६. शिमला मिरची - १/२ कप 
६. गाजर - १/२ कप (किसलेल)
७. कोबी - १/२ कप (किसलेल)
८. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)
९. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या (बारीक चिरलेल्या)
१०. पालक - १/२ कप (बारीक चिरलेला)
११. रवा - १ कप 
१२. दही - १/२ कप 
१३. मीठ - चवीनुसार 
१४. तेल - २ ते ४ टेबलस्पून 
१५. बेसन - १ टेबलस्पून 
१६. कोथिंबीर - २ टेबलस्पून 
१७. पाणी - गरजेनुसार

मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...


हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एक बाऊल घेऊन त्यात उरलेली डाळ आणि भात घेऊन ते एकत्रित मिक्स करून चमच्याने दाब देत थोडे मॅश करून घ्यावे. 
२. आता या मिश्रणात गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर घालावी. 
३. त्यानंतर या मिश्रणात आपल्या आवडीनुसार हव्या त्या भाज्या बारीक चिरून किंवा किसून घालाव्यात. 
४. या मिश्रणात शिमला मिरची, गाजर, कोबी, कांदा, हिरव्या मिरच्या, पालकअशा वेगवेगळ्या भाज्या आपल्या आवडीनुसार घालाव्यात. 
५. त्यानंतर या बॅटरमध्ये रवा, दही व चवीनुसार मीठ घालावे. 

६. सगळ्यात शेवटी या बॅटरमध्ये गरम तेल, बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर व गरजेनुसार पाणी घालून मध्यम कंन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करून घ्यावे.
७. आता हे तयार बटर १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे. 
८. आता एक पॅन घेऊन त्या पॅनला थोडेसे तेल लावून त्यावर तयार बॅटर डोशाप्रमाणे गोलाकार आकारात सोडून दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यावे. 

मकर संक्रांती स्पेशल : आजी करायची त्या पदार्थांची ही घ्या यादी, लहानपणच्या आठवणींचा गोडवा...

उरलेल्या डाळ - भाता पासून झटपट तयार होणारे हे गरमागरम धिरडे खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा चटणी सोबत हे धिरडे खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

Web Title: Leftover Rice & Dal Chilla Leftover Rice & Dal Recipe Don't Waste Leftover Rice & Dal Make This Snacks Recipe For Morning Breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.