Join us  

उरलेल्या शिळ्या भाताचा करा मऊ जाळीदार ढोकळा, इन्स्टंट ढोकळा रेसिपी - करा झटपट नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2024 12:11 PM

Leftover Rice Instant Dhokla Recipe : भाताला फोडणी देऊन आपण नेहमी खातो, यंदा उरलेल्या भाताचा चविष्ट ढोकळा करून खा..

ढोकळ्याचा (Rice Dhokla) खवय्यावर्ग फार मोठा आहे. ढोकळा फक्त गुजराथी लोकं खात नसून, महाराष्ट्रात देखील नाश्त्यामध्ये आवर्जून खाल्ला जातो. खमण ढोकळा विविध प्रकारे केले जाते. काही लोकं डाळ किंवा बेसनाचा ढोकळा तयार करतात. पण आपण कधी उरलेल्या भाताचा ढोकळा करून पाहिलं आहे का? उरलेला भात आपण फार तर फार फोडणी देऊन खातो.

पण त्याव्यतिरिक्त त्याचा कोणता पदार्थ तयार करत नाही (Cooking Tips). उरलेला भात खाताना लोकं नाकं मुरडतात. फोडणीच्या भाताव्यतिरिक्त आपल्याला काहीतरी भन्नाट खाण्याची इच्छा झाली असेल तर, ढोकळा करून खा. झटपट इन्स्टंट रेसिपी काही मिनिटात तयार होते(Leftover Rice Instant Dhokla Recipe).

उरलेल्या भाताचा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

उरलेला भात

बेसन

दही

नितीन गडकरींना आवडतो पुण्यातील प्रसिद्ध वडा, स्वतः सांगितली चमचमीत वड्याची सोपी रेसिपी

रवा

तेल

मोहरी

पांढरे तीळ

पिठी साखर

कोथिंबीर

मीठ

इनो

पाणी

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप उरलेला भात. अर्धा कप बेसन आणि अर्धा कप दही घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप रवा घालून मिक्स करा.

आता फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा पांढरे तीळ घाला. मोहरी तडतडली की, तयार फोडणी बॅटरमध्ये ओतून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, एक चमचा पिठी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवा.

जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी

५ मिनिटानंतर त्यात एक चमचा इनो घाला. इनोवर अर्धा कप पाणी ओतून चमच्याने मिक्स करा. एका भांड्याला ब्रशने तेल लावा. भांड्यात तयार बॅटर ओता. त्यावर लाल तिखट शिंपडा. दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवा, व १० मिनिटांसाठी ढोकळा वाफेवर शिजवून घ्या. १० मिनिटानंतर भांडं बाहेर काढा. सुरीने त्याचे काप तयार करून चटणीसोबत सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स