Lokmat Sakhi >Food > उरलेल्या भाताची करा कुरकुरीत भजी; रेसिपी सोपी आणि भरपावसात चहासोबत नाश्ता भारी

उरलेल्या भाताची करा कुरकुरीत भजी; रेसिपी सोपी आणि भरपावसात चहासोबत नाश्ता भारी

Leftover Rice Pakora : भात उरला तर शिळा खावासा वाटत नाही, फोडणीच्या भाताचाही कंटाळा आला तर करा झटपट भजी.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:04 PM2022-07-06T16:04:50+5:302022-07-08T12:33:25+5:30

Leftover Rice Pakora : भात उरला तर शिळा खावासा वाटत नाही, फोडणीच्या भाताचाही कंटाळा आला तर करा झटपट भजी.

Leftover Rice Pakora : Make crispy, bhaji from leftover rice for evening breakfast | उरलेल्या भाताची करा कुरकुरीत भजी; रेसिपी सोपी आणि भरपावसात चहासोबत नाश्ता भारी

उरलेल्या भाताची करा कुरकुरीत भजी; रेसिपी सोपी आणि भरपावसात चहासोबत नाश्ता भारी

आतापर्यंत तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी अनेकदा खाल्ली असेल.  उरलेल्या भातापासून तयार होणारी भजी कधीही खाल्ली नसेल. उरलेल्या भातापासून नेहमीच फोडणीचा भात बनवण्यापेक्षा तुम्ही हा नवीन भजीचा प्रकार ट्राय करू शकता.  जेवणाच्या वेळी घरांमध्ये भात अनेकदा तयार केला जातो. (Cooking Tips) भात उरला असेल तर या उरलेल्या भातापासून पकोडे, भजीही बनवू शकता.  या भजीची चव अप्रतिम असेल आणि अगदी कमी वेळात तयार होईल. तर मग उरलेल्या भातापासून चविष्ट, कुरकुरीत भजी कशी  बनवायची ते जाणून घेऊया. (How to make Pakoda From Leftover Rice)

साहित्य

१ वाटीभर भात

बेसन दोन वाट्या

कांदा बारीक चिरून

अर्धा टीस्पून किसलेले आले

लाल तिखट

हळद

हिरव्या मिरच्या

चिमूटभर

हिंग

धनेपूड

जिरेपूड

कोथिंबीर, बारीक चिरून

तेल

मीठ चवीनुसार

भाताची भजी कशी बनवायची

सगळ्यात आधी उरलेला भात  घ्या.  मॅश करा. नंतर त्यात बेसन, बारीक चिरलेला कांदा, हिरवी धणे, लाल तिखट घाला. तसेच किसलेले आले घाला, छान कालवून घ्या.  आता त्यात जिरेपूड, धणेपूड, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. हे मिश्रण दहा मिनिटे ठेवा.

दहा मिनिटांनंतर तांदळाचे पीठ घेऊन त्यात पाणी घाला. जेणेकरून ते पातळ होईल. आता गॅसवर कढई ठेवा. तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर तांदळाच्या पीठात आधी डिप करून मग भजी तळून घ्या. भजी तळून तळल्यानंतर टिश्यूपेपरवर ठेवून एक्स्ट्राचे तेल बाहेर काढून घ्या. तयार आहेत गरमगरम  भजी.  भजी तुम्ही सॉस, चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: Leftover Rice Pakora : Make crispy, bhaji from leftover rice for evening breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.