Join us  

उरलेल्या भाताचा करा मऊ- मोकळा फोडणीचा भात, पाहा १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 1:26 PM

Leftover Rice Recipe fodnicha bhat : उरलेल्या भाताचा करा चवदार फोडणीचा भात; शिळा भातही मऊ-मोकळा होईल, पाहा सोपी रेसिपी

रात्रीचा किंवा दुपारचा भात शिल्लक राहिला असेल तर त्याचं  काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कारण जास्तीचं जेवण बनवल्यानंतर ते वाया जाऊ नये यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. भात उरला असेल तर तुम्ही अगदी कमीत वेळात एक कांदा चिरून फोडणीचा भात बनवू शकता. (Fodnichat Bhat Recipe)

फोडणीचा भात बनवायला एकदम सोपा आहे. कधी कधी फोडणीचा भात मनासारखा बनत नाही त्यामुळे बरेचजण असा भात खाणं टाळतात. फोडणीचा भात बनवण्याची चवदार, चविष्ट रेसिपी पाहूया. (How to make fodnicha bhat) 

साहित्य

१) उरलेला भात- २ वाटी

२) जीरं- अर्धा टिस्पून 

३) मोहोरी- अर्धा टिस्पून

४) बारीक चिरलेले लसूण- ४ ते ५

५) कढीपत्ता पानं- ८ ते ९

६) बारीक चिरलेला कांदा- १

७) हळद- अर्धा टिस्पून

८) लाल तिखट- अर्धा टिस्पून

९) चवीनुसार- मीठ

१०) तेल- फोडणीकरीता

कृती

१) फोडणीचा भात करण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात जीरं, मोहरी, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, कांदा घालून व्यवस्थित परतून घ्या.

वरण-भाताबरोबर खायला पटकन करा खमंग बटाटा फ्राय; सोपी रेसिपी, साध्या जेवणाची वाढेल चव

२) कांदा गुलाबी होईपर्यंत परतल्यानंतर त्यात लाल तिखट घाला. यात तुम्ही हळद गरम मसाला किंवा पावभाजी मसाला सुद्धा घालू शकता. मग भात घालून व्यवस्थित परतवून घ्या.  

३) त्यात भात घाला. मग मीठ घालून चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करा.  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तयार आहे गरमागरम फोडणीचा भात.  फोडणीचा भात तुम्ही लोणचं आणि पापडाबरोबर खाऊ शकता. 

फोडणीचा भात अधिक चवदार होण्यासाठी काय करता येईल?

उरलेल्या भाताला साधी फोडणी न देता तुम्ही त्यात तासभर आधी भिजवलेली चण्याची डाळ घालू शकता. पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहोरी, जिऱ्याची फोडणी द्या. मग शेंगदाणे घालून ते ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. मग कांदे  नंतर चणा डाळ घाला.

डाळ तांदूळ न वाटता-न आंबवता १० मिनिटांत करा पौष्टीक डोसा; सोपी रेसिपी-झटपट नाश्ता

त्यात हिरवी मिरची आणि लिंबाचा रस मिसळा. या भाताची लेमन राईसप्रमाणे चव लागेल. तुम्ही त्यात लिंबाऐवजी टोमॅटोचे बारीक काप फोडणी देताना घालू शकता. टोमॅटोचा तडका  दिल्याने भात अधिक चविष्ट,  चवदार लागेल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न