Lokmat Sakhi >Food > उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत इन्स्टंट वडे, शिळ्या भाताला द्या नवे खमंग रंगरुप

उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत इन्स्टंट वडे, शिळ्या भाताला द्या नवे खमंग रंगरुप

Leftover rice to crispy vada in 10 minutes! भाताचे वडे करण्याची सोपी इन्स्टंट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 01:31 PM2023-07-22T13:31:23+5:302023-07-22T13:37:27+5:30

Leftover rice to crispy vada in 10 minutes! भाताचे वडे करण्याची सोपी इन्स्टंट रेसिपी

Leftover rice to crispy vada in 10 minutes! | उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत इन्स्टंट वडे, शिळ्या भाताला द्या नवे खमंग रंगरुप

उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत इन्स्टंट वडे, शिळ्या भाताला द्या नवे खमंग रंगरुप

विकेंड म्हटलं की काही तरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात अनेकांना पोहे, उपमा, इडली, डोसा खाऊन कंटाळा येतो. जर आपल्याला काहीतरी हटके पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल तर, शिळ्या भाताचे मेदू वडे ही रेसिपी ट्राय करून पाहा. प्रत्येकाच्या घरात भात शिल्लक राहतोच. मग शिळ्या भाताचे करायचे काय? असा प्रश्न पडतो.

फोडणीचा भात नेहमीचाच, अशा वेळी आपण घरगुती साहित्यात शिळ्या भाताचे मेदू वडे, ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता. हे वडे नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणाबरोबरही खाल्ले जाऊ शकतात. चला तर मग शिळ्या भाताचे इंस्टंट टेस्टी मेदू वडे कसे तयार करायचे हे पाहूयात(Leftover rice to crispy vada in 10 minutes!).

शिळ्या भाताचे इंस्टंट मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

उरलेला भात

दही

पाणी

रवा

अर्धी वाटी खोबरं - एक चमचा तेल, ५ मिनिटात करा खोबऱ्याची चटकदार चटणी

मीठ

हिरवी मिरची

आलं

तेल

कृती

सर्वपथम, मिक्सरच्या भांड्यात २ कप शिळा भात घ्या, त्यात अर्धा कप दही व अर्धा कप पाणी घालून पेस्ट तयार करा. ज्याप्रमाणे आपण मेदू वड्यासाठी पीठ तयार करतो, त्याच प्रमाणे पीठ तयार करायचे आहे. तयार पीठ एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात अर्धा कप रवा,  चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं घालून साहित्य एकजीव करा. त्यावर २० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

माधुरी दीक्षित सांगतेय, पावसाळ्यात ऑइल फ्री भजी खाण्याची गंमत, न तळता भजी करण्याची रेसिपी

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. हाताला पाणी लावा, व थोडे बॅटर घेऊन, त्याला मेदू वड्याचा आकार द्या. गरम तेलात वडे सोडून, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे शिळ्या भाताचे इंस्टंट मेदू वडे खाण्यासाठी रेडी. आपण हे मेदू वडे खोबऱ्याची चटणी, अथवा सॉससोबतही खाऊ शकता.

Web Title: Leftover rice to crispy vada in 10 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.