आपल्या देशात एक पद्धत आहे. मग ते कोणतेही राज्य असो आपण अन्न वाया जाऊ देत नाही. (Leftover rice, water and chocolate, once you try this chocolate mousse)उरलेल्या अन्नापासून अगदी चविष्ट असे पदार्थ तयार केले जातात. जसे की फोडणीची पोळी असेल किंवा मग फोडणीचा भात. वेगवेगळ्या फोडण्या देऊन उरलेला पदार्थ आपण आणखी चविष्ट करून खातो. उरलेल्या भाताला फोडणी तर घरोघरी दिली जातेच. काही घरांमध्ये उरलेल्या भाताची भजी तयार केली जाते. (Leftover rice, water and chocolate, once you try this chocolate mousse) ती भजीही फार चविष्ट असते. त्याच प्रकारे भाताचा आणखी एक पदार्थ तयार करता येतो. हा पदार्थ मात्र फोडणी दिलेला नसून चवीला गोड आहे. तुम्ही कधी चॉकलेट मूस खाल्ले आहे का?
मूस म्हणजे जरा कमी गोड आणि एकदम मऊ असे चॉकलेट असते. जिभेवर ठेवल्या ठेवल्या ते विरघळून जाते. एकदमच सॉफ्ट असते. ज्यांना चॉकलेट आवडते अशा लोकांसाठी तर ही मेजवानीच आहे. (Leftover rice, water and chocolate, once you try this chocolate mousse)कोणताही मैदा न वापरता हे तयार करता येते. फक्त शिजलेल्या भाताचा वापर करून तयार केलेली ही रेसिपी खुपच सोपी आहे. तयार करायलाही काही फार वेळ लागत नाही. पाहा काय करायचे.
साहित्य
शिजवलेला भात, आवडीचे चॉकलेट, पाणी
कृती
१. भातामध्ये पाणी घाला आणि भात मऊ होऊ द्या.
२. तुमच्या आवडीचे चॉकलेट घ्या. प्लेन असलेले वापरा. त्यामध्ये सुकामेवा किंवा इतर काही असलेले वापरू नका. गॅसवर पातेले ठेवा त्यामध्ये पाणी ओता. त्यावरती एक भांडे बसवा जे पातेल्याच्या आतमध्ये जाणार नाही. मग त्यामध्ये चॉकलेटचे तुकडे करून घाला. पाण्याच्या वाफेवर ते चॉकलेट मेल्ट होईल. अगदी पातळ पेस्ट तयार करून घ्या.
३. मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला भात घ्या. त्यामध्ये वितळलेले चॉकलेट टाका. गरजे पुरते पाणी वापरा.
४. सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. अति पातळ करू नका. भात पूर्ण वाटला गेला की मग मिक्सर बंद करा.
५. एका खोलगट भांड्यामध्ये तयार मिश्रण ओता. ४ तासासाठी फ्रिजमध्ये झाकून ठेवा.
६. ४ तासांनंतर ते सेट होईल. एकदम मऊ आणि सॉफ्ट होईल.