आदल्या दिवशीच्या किंवा सकाळच्या उरलेल्या चपात्या कोणालाच खायला आवडत नाहीत. अशा स्थितीत चपात्या फेकून देण्याशिवाय आपल्याकडे उपाय नाही. (Cooking Tips and Tricks) पण अन्नपदार्थांची नासाडी करणे म्हणजे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे. जर तुमच्या घरात शिळ्या चपात्या उरल्या असतील तर कमीत कमी वेळात चविष्ट बनवता येऊ शकता. (Leftover Roti Recipe) इतकंच नाही तर एकदा खाल्ल्यानंतर लोक तुम्हाला या चपात्यांच्या रेसेपीजसुद्धा विचारतील.
चपाती टिक्की
थोडी लाल तिखट आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स रात्रीच्या चपात्या उरल्या असतील तर त्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. आता या पावडरमध्ये उकडलेले बटाटे घाला आणि आवश्यकतेनुसार आले पेस्ट, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, मीठ, धणे, करा. आता त्यात लिंबू टाकून छोट्या टिक्क्या करा. या टिक्क्यांना हलक्या तेलाच्या साहाय्याने तव्यावर भाजून घ्या. गरमागरम चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा.
अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरून जाण्याआधी ४ गोष्टी करा; तब्येत सांभाळण्याचे सोपे उपाय
रोटी नुडल्स
उरलेल्या चपात्या बारीक कापून नूडल्ससारख्या लांब करा. आता एका कढईत चिरलेला कांदा, लसूण, शिमला मिरची, कोबी इत्यादी टाका आणि मंद आचेवर तळून घ्या. आता त्यात रेड चिली सॉस, व्हिनेगर, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस घाला आणि त्यात चिरलेल्या चपात्यांचे काप घाला. तुमचे रोटी नूडल्स तयार आहेत.
रोटी फ्राय
शिळ्या रोट्यांचे छोटे तुकडे करून त्यात मीठ, हिरवी मिरची, आंबा पावडर आणि धनेपूड घाला. आता कढईत कांदा, सिमला मिरची, कोबी घालून परतून घ्या. चपात्यांमध्ये मसाले मिक्स केल्यानंतर कढईत ढवळून घ्या. ५ मिनिटात तुमची रोटी फ्राय तयार होईल.
कुकरमध्ये डाळ शिजवताना टाळा 3 चुका; चव आणि पोषण उत्तम हवी तर वापरा ४ टिप्स
रोटी पिज्जा
उकडलेले बटाटे, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, मीठ, मिरपूड, धनेपूड आणि आमचूर एकत्र मॅश करा. आता थोडे लेट्यूस, टोमॅटो, कांदा आणि काकडी कापून ठेवा. आता उरलेल्या रोटीवर टोमॅटो केचप किंवा शेझवान सॉस लावा आणि बटाट्याचा मॅश पसरवा आणि त्यावर सॅलडचे तुकडे टाकून बेक करा. आपण त्यावर चीज देखील पसरवू शकता.