लिंबाचे लोणचे तर चटकदार होतेच. पण या लिंबाला जर मस्त झणझणीत मिरचीची जोड मिळाली, तर मात्र लोणच्याची चव अधिकच बहरून येते. असे लोणचे जर ताटात असेल तर जेवणाचा आनंदही द्विगुणित होतो आणि जेवणाराही विशेष खुश होतो. तोंडाची चव गेली असेल किंवा आजारपणातून नुकतंच कोणी उठलं असेल आणि अन्नावरची वासना उडाली असेल, तर हे लोणचे नक्की चाखायला द्या.
लिंबू मिरचीचे लोणचे बनविण्यासाठी लागणारे साहित्यअर्धा किलो लिंबूअर्धा किलो मिरच्याचवीनुसार मीठ७ टेबलस्पून मोहरीची डाळदीड टेबलस्पून हळद
लोणचे बनविण्याची कृती१. सगळ्यात आधी तर लिंबू आणि मिरच्या दोन्हीही चांगले धुवून घ्या आणि स्वच्छ कपड्याने पुसून एकदम कोरडे करून घ्या. लिंबू आणि मिरची जराशीही ओलसर राहिली, तरी लोणचे खराब होण्याची शक्यता असते. २. यानंतर लिंबू चिरून घ्या. एका लिंबाच्या आठ फोडी कराव्यात. यामुळे सगळ्या फोडी अगदी एकसारख्या होतात. लिंबाच्या बिया काढून टाकाव्यात.३. मिरचीचा आकार पाहून तुम्हाला जसे आवडतात तसे मिरचीचे काप करून घ्यावेत. साधारण एका मध्यम लांबीच्या मिरचीचे दोन ते तीन तुकडे करावेत.
४. लिंबाच्या फोडी आणि मिरचीचे काप एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये मीठ, मोहरी डाळ, हळद घालून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या. स्वच्छ बरणीत भरून ठेवा. ५. १० ते १२ दिवस हे लोणचे दररोज हलवावे. अन्यथा ते बुरशी लागून खराब होऊ शकते. ६. जर तुम्हाला आवडत असेल तर लोणचे मुरल्यावर त्यात तेल गरम करून घालावे.
लिंबू मिरचीचे लोणचे खाण्याचे फायदे१. आजारातून उठलेल्या व्यक्तीला हे लोणचे खायला दिल्यास अन्नावरची उडालेली वासना काही अंशी कमी होते आणि तोंडाला चव येते.२. लिंबाच्या लोणच्यामुळे पचनक्रिया सुधारते.३. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्तीही सुधारते.