Lokmat Sakhi >Food > गवती चहा घालून पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची तलफ भागवा, टपरीवरच्या चहाहून भारी चव

गवती चहा घालून पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची तलफ भागवा, टपरीवरच्या चहाहून भारी चव

lemon grass tea recipe | fresh lemongrass tea पावसाळ्यात चहात गवती चहा हवाच, त्यासाठीच ही खास टिपसह कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 02:29 PM2023-07-19T14:29:10+5:302023-07-19T14:29:54+5:30

lemon grass tea recipe | fresh lemongrass tea पावसाळ्यात चहात गवती चहा हवाच, त्यासाठीच ही खास टिपसह कृती

lemon grass tea recipe | fresh lemongrass tea | गवती चहा घालून पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची तलफ भागवा, टपरीवरच्या चहाहून भारी चव

गवती चहा घालून पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची तलफ भागवा, टपरीवरच्या चहाहून भारी चव

बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाळा अखेर सुरु झाला. रिमझिम पडणाऱ्या सरी अनेकांना हव्या - हव्याश्या वाटतात. पावसाची खरी मज्जा खवय्यावर्ग लुटतात. पाउस पडला की, चहाप्रेमींना चहा पिण्याची तलफ लागते. या दिवसात अनेक प्रकारच्या चहा केले जातात. बासुंदी चहा, गुळाचा चहा, मसाला चहा असे अनेक प्रकार केले जातात. पण आपण कधी गवती चहा करून पाहिले आहे का?

फक्कड गवती चहा करताना त्याचा सुवास घरभर दरवळतो. गवती चहा फक्त चवीला उत्कृष्ट नसून, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. सर्दी, ताप आल्यास गवती चहा पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. चला तर मग आरोग्यदायी सुगंधित गवती चहा कसा तयार करायचा हे पाहूयात(lemon grass tea recipe | fresh lemongrass tea).

गवती चहा करण्यासाठी लागणारं साहित्य

गवती चहाची पानं

चहापत्ती

साखर

किसलेलं आलं

माधुरी दीक्षित सांगतेय, पावसाळ्यात ऑइल फ्री भजी खाण्याची गंमत, न तळता भजी करण्याची रेसिपी

पाणी

दूध

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात दोन कप पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा, पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बारीक केलेली गवती चहाची पानं घाला. गवती चहाची पानं घातल्यानंतर त्यात एक चमचा बारीक किसलेलं आलं, एक चमचा चहापत्ती घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करा. व त्यात एक कप गरम केलेलं दूध घाला. दूध ओतल्यानंतर चहाला एक उकळी येऊ द्यावी, उकळत्या चहामध्ये आपण त्यात आवडीनुसार साखर घालू शकता.

१ कप गव्हाचं पीठ - अर्धा कप रवा, १० मिनिटांत करा गव्हाचा कुरकुरीत डोसा

सुरवातीलाच साखर घातल्याने चहा चिकट व गोडसर होतो, साखरेचा पाक तयार होतो. त्यामुळे गवती चहा करताना साखर शेवटी घालावी. यामुळे लेमनग्रासची चव चहामधून कमी होत नाही. चहाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. व गाळणीतून चहा एक कपमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे गवती चहा पिण्यासाठी रेडी.

Web Title: lemon grass tea recipe | fresh lemongrass tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.