Lokmat Sakhi >Food > लिंबू नको नी साखर-मीठही नको, १ सोपी ट्रिक-५ मिनिटांत करा गारेगार लिंबू सरबत...

लिंबू नको नी साखर-मीठही नको, १ सोपी ट्रिक-५ मिनिटांत करा गारेगार लिंबू सरबत...

Lemon Juice Powder : lemon Juice Premix : lemon Juice Powder Mix : How To Make Lemon Powder : उन्हाळ्यासाठी लिंबू सरबत प्रिमिक्स कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 08:40 IST2025-03-27T08:22:34+5:302025-03-27T08:40:00+5:30

Lemon Juice Powder : lemon Juice Premix : lemon Juice Powder Mix : How To Make Lemon Powder : उन्हाळ्यासाठी लिंबू सरबत प्रिमिक्स कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहा...

Lemon Juice Powder lemon Juice Premix lemon Juice Powder Mix How To Make Lemon Powder | लिंबू नको नी साखर-मीठही नको, १ सोपी ट्रिक-५ मिनिटांत करा गारेगार लिंबू सरबत...

लिंबू नको नी साखर-मीठही नको, १ सोपी ट्रिक-५ मिनिटांत करा गारेगार लिंबू सरबत...

भर उन्हातून आलो की आपल्याला काहीतरी गारेगार प्यावेसे वाटते. उन्हाळ्याने सतत घशाला कोरड पडत असताना थंडगार काहीतरी पोटात गेलं की आपल्याला शांत वाटतं. लिंबू सरबत (Lemon Juice Powder) हा पारंपरिक प्रकार आपण नेहमीच करतो.लिंबामध्ये (How To Make Lemon Powder) व्हीटॅमिन 'सी' असते तसेच साखर आणि मीठ पोटात ( lemon Juice Premix ) गेल्यावर उन्हामुळे आलेला थकवा आणि ग्लानी दूर होण्यास मदत होते. दुपारच्या कडक उन्हात हे सरबत प्यायल्यास आपल्याला नक्कीच थोडी एनर्जी आल्यासारखे वाटते. म्हणूनच आपण बाहेरुन आलो किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत कोणी पाहुणे आले (lemon Juice Powder Mix) की चहा-कॉफीऐवजी आवर्जून लिंबू सरबत केले जाते (Easy Recipe of Lemon Limbu Sharbat Premix). 

लिंबाचे सरबत करण्यासाठी लिंबू चिरणे, बिया काढणे ते पाण्यात पिळणे, मग साखर आणि मीठ घालून हे सगळे हलवून एकजीव करणे अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण हा वेळ वाचावा आणि झटपट २ मिनीटांत लिंबू सरबत तयार व्हावे यासाठी आपण लिंबू सरबत पावडर किंवा प्रिमिक्स कसे तयार करायचे त्याची रेसिपी पाहूयात. लिंबू सरबताचे हे प्रिमिक्स तयार करण्यासाठी नेमक काय करावं ते पाहूयात. 

साहित्य :- 

१. लिंबाचा रस - १ कप 
२. साखर - ३ कप 
३. मीठ - १ टेबलस्पून 

डाळ - तांदुळ भिजत न घालता, फक्त वाटीभर कुरमुऱ्यांचा करा डोसा - सकाळचा नाश्ता होईल झक्कास!


चटणी है क्या? ६ चटण्यांचे पाहा सुपरहिट प्रकार, जेवणाला येईल रंगत-तोंडी लावा चटणी चटपटीत...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी लिंबाचा रस काढून घ्यावा. लिंबाचा रस काढून घेतल्यावर तो गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावा. 
२. त्यानंतर लिंबाच्या रसात साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. 
३. आता चमच्याने ढवळून लिंबाच्या रसात साखर आणि मीठ व्यवस्थित विरघळवून घ्यावे. 
४. लिंबाच्या रसात साखर आणि मीठ विरघळल्यानंतर मोठ्या कडा असलेल्या डिश घेऊन त्यात हे मिश्रण पसरवून ओतून घ्यावे. 

दही मस्त घट्ट लावण्याची ‘ही’ ट्रिक पाहा, फक्त १५ मिनिटांत दही विरजण्याची युक्ती...

५. त्यानंतर या डिश फॅनखाली ठेवून ३ ते ४ दिवस किंवा संपूर्ण सुकेपर्यंत वाळवून घ्यावे. (चुकूनही उन्हांत वाळवू नका.)
६. ताटातील मिश्रण संपूर्णपणे वाळल्यानंतर सूरी किंवा चमच्याच्या मदतीने खरडवून घ्यावे. 
७. ताटातील खरडवून काढलेले मिश्रण एका मिक्सर जारमध्ये घेऊन ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. 
८. ही तयार पावडर एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावी. 

इन्स्टंट लिंबू सरबत तयार करण्यासाठीची पावडर किंवा प्रिमिक्स तयार आहे. ग्लासभर पाण्यांत ही पावडर घालूंन फक्त चमच्याने ढवळा आणि थंडगार लिंबू सरबत पिण्यासाठी तयार...

Web Title: Lemon Juice Powder lemon Juice Premix lemon Juice Powder Mix How To Make Lemon Powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.