आपल्या भारतीय थाळीमध्ये लिंबाच्या फोडीला फार महत्व आहे. कोणतीही भारतीय थाळी ही लिंबूशिवाय अधुरीच आहे. भारतीय थाळीमध्ये लिंबाच्या फोडीचे स्थान हे एका कोप्यात असले तरी तिचे महत्व अधिक आहे. गरमागरम मिसळ, कांदेपोहे, वरण - भात, उपमा यांच्यावर लिंबाच्या रसाची धार सोडल्याशिवाय या पदार्थांना चव येत नाही. सध्या थंडीच्या सिजनमध्ये बाजारात एकूणच सगळ्या भाज्या छान फ्रेश मिळतात. कित्येकदा आपण भाजी घेताना त्यासोबत लिंबू, कोथिंबीर आवर्जून घेतो. हे लिंबू बऱ्याचदा फ्रिजमध्ये खूप काळ ठेवले की खराब होण्याची शक्यता असते. तसेच बाहेर ठेवले तरी ते लगेच वाळून जाण्याची शक्यता असते. भाज्या आणि फळे दिर्घकाळ टिकावीत म्हणून आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण लिंबू फ्रिजमध्येही वाळून जातात आणि कडक होतात. अशावेळी पैसे तर वाया जातातच पण लिंबूही वाया जाते. पण लिंबू साठवून ठेवण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित असेल तर? पाहूया लिंबू कसे साठवले तर ते १ महिन्यापर्यंत आहे तसेच राहतात. पाहूयात यासाठी कोणती ट्रिक वापरायची. (Tip on How To Store Lemons So That They Stay Fresh For a Month).
MasterChef Pankaj Bhadouria यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून या खास टीप्स शेअर केल्या आहेत.
लिंबू खूप दिवस टिकून राहण्यासाठी काय करता येईल ?
जेव्हा आपण बाजारातून लिंबू खरेदी करून आणतो तेव्हा ते असेच फ्रिजमध्ये ठेवू नका. ही लिंब खराब होऊ नये म्हणून जास्त दिवसांसाठी साठवून ठेवायची असतील तर एक सोपा उपाय आहे.
१. एक काचेची बरणी घ्या.
२. काचेची बाटली संपूर्ण भरेल इतके पाणी त्यात घ्या.
३. त्यानंतर त्यात एक एक लिंबू सोडा.
४. मग काचेच्या बरणीचे झाकण घट्ट लावून घ्या.
५. ही बरणी नंतर फ्रिजमध्ये ठेवा.
असे केल्याने हे लिंबू किमान १ महिना खराब न होता चांगले राहू शकतात.
लिंबूमधील जास्तीत जास्त रस काढण्यासाठी...
लिंबू चिरण्याआधी एका सपाट पृष्ठभागावर म्हणजेच किचनच्या ओट्यावर किंवा चॉपिंग बोर्डवर लिंबू घेऊन तो रोलिंग करा.
तुमच्या हाताचा पंजा आणि सपाट पृष्ठभाग यांच्या मध्ये लिंबू ठेवून रगडल्यास त्यातून जास्त प्रमाणात रस मिळू शकतो.