Join us  

१० रुपयांचा ग्लुकोज बिस्कीट पुडा आणा आणि करा घरीच मस्त आइस्क्रिम, पाहा झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2023 5:49 PM

Less Ingredient Parle G Ice Cream Recipe For Midnight Sweet Cravings ग्लुकोज बिस्कीट आणि दूध, घरच्या साहित्यात तयार होईल गोडसर आईस्क्रीम..

उन्हाळा सुरु झाला की, थंड पदार्थ खाण्यासाठी लोकं विविध थंड पेय, आईस्क्रीम असे पदार्थ बनवतात. घश्याला गारवा देण्यासाठी हे पदार्थ मदत करतात. कडाक्याच्या गरमीमधून घरी आल्यानंतर सर्वप्रथम, आपण फ्रिज खोलून पाहतो. फ्रिजमध्ये जर आईस्क्रीम असेल तर, सगळेच मंडळी खुश होतात. आईस्क्रीम बनवणे ही सोपी गोष्ट नाही, पण साहित्यांचे प्रमाण कळले की, अवघड देखील नाही.

आज आपण ग्लुकोज बिस्किट्स आणि दुध या साहित्यांचा वापर करून आईस्क्रीम बनवणार आहोत. ग्लुकोज बिस्किट्स आणि दुध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. १० रुपयांच्या बिस्कीट पॅकेटमधून आपण ५ आईस्क्रीम स्टिक बनवू शकतो. कमी साहित्यात घरच्या घरी आपल्याला चवदार स्वादिष्ट, गोडसर आईस्क्रीम मिळेल. चला तर मग या झटपट पदार्थाची कृती पाहूयात(Less Ingredient Parle G Ice Cream Recipe For Midnight Sweet Cravings).

ग्लुकोज बिस्कीट आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य

ग्लुकोज बिस्कीट (Parle-G)

दूध

पिनट बटर

पिठी साखर

मिल्क पावडर

चॉको चिप्स

बदाम

कृती

सर्वप्रथम, एका मिक्सरच्या भांड्यात ग्लुकोज बिस्किटांचे तुकडे करून घाला. आता या बिस्किटांना चांगले वाटून पावडर तयार करा.  ही बिस्किटांची पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात दूध घालून मिश्रण मिक्स करा, आता त्यात पिनट बटर, चॉको चिप्स, मिल्क पावडर, बदामाचे तुकडे, पिठी साखर, घालून मिश्रण मिसळून घ्या.

आता आईस्कीम मोल्ड घ्या. त्या मोल्डमध्ये हे मिश्रण ओता. त्यावर चॉको चिप्स आणि बदामाचे तुकडे घाला, आईस्कीम स्टिक लावून मोल्ड फ्रिझरमध्ये रेफ्रिजरेट करण्यासाठी ठेवा. आईस्क्रीम तयार झाल्यानंतर त्यावरून मेल्ट चॉकोलेटने गार्निश करा. अशा प्रकारे १० रुपयांच्या ग्लुकोज बिस्किटांमध्ये चविष्ट आईस्क्रीम तयार.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल