Lokmat Sakhi >Food > ना लाटण्याची झंझट, ना कणीक मळण्याचे टेन्शन, लिक्विड आलू पराठ्याची व्हायरल रेसिपी, पराठा रेडी...

ना लाटण्याची झंझट, ना कणीक मळण्याचे टेन्शन, लिक्विड आलू पराठ्याची व्हायरल रेसिपी, पराठा रेडी...

No stuffing aloo paratha recipe : Liquid Aloo Paratha : Here’s How You Can Make Aloo Paratha With Thin Liquid-Like Dough : घाई गडबडीच्यावेळी अगदी १० मिनिटांत होणाऱ्या लिक्विड आलू पराठ्याची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 08:02 PM2024-08-22T20:02:30+5:302024-08-22T20:16:45+5:30

No stuffing aloo paratha recipe : Liquid Aloo Paratha : Here’s How You Can Make Aloo Paratha With Thin Liquid-Like Dough : घाई गडबडीच्यावेळी अगदी १० मिनिटांत होणाऱ्या लिक्विड आलू पराठ्याची सोपी रेसिपी...

Liquid Aloo Paratha Aloo Paratha Recipe With Liquid Dough Here’s How You Can Make Aloo Paratha With Thin Liquid-Like Dough | ना लाटण्याची झंझट, ना कणीक मळण्याचे टेन्शन, लिक्विड आलू पराठ्याची व्हायरल रेसिपी, पराठा रेडी...

ना लाटण्याची झंझट, ना कणीक मळण्याचे टेन्शन, लिक्विड आलू पराठ्याची व्हायरल रेसिपी, पराठा रेडी...

सगळ्यांच्याच 'ऑल टाईम फेव्हरेट' पदार्थांच्या यादीत पराठ्याचे नाव हे पहिले येते. 'पराठा' हा असा पदार्थ जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाणे पसंत करतो. पराठ्यांचे वेगवेगळे असे असंख्य प्रकार असतात. पराठ्यांचे असे कितीही प्रकार असले तरीही या सगळ्यांत 'आलू पराठा' हा सगळ्यांचाच आवडीचा प्रकार असतो. 'पराठा' हा एकमेव असा पदार्थ आहे की जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. प्रत्येक घरात आलू पराठा हमखास केला जातो. आलू पराठा करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते(Aloo Paratha Recipe With Liquid Dough).

आलू पराठा (Perfect Aloo Paratha Recipe with Tips & Tricks : Aloo Paratha Recipe) हा शक्यतो बटाटा उकडवून त्यात सगळे मसाले घालून त्याचे स्टँफिंग बनवून तयार केला जातो. त्याचबरोबर गव्हाच्या पिठात उकडलेला बटाटा कुस्करुन घालून देखील आलू पराठा बनवला जातो. काहीवेळा घाई गडबडीत आपल्याला बटाटे उकडवून घेण्यास किंवा त्याचे स्टफिंग (No stuffing aloo paratha recipe) तयार करण्यास तितकासा वेळ नसतो. अशावेळी आपण झटपट एक सोपी (Here’s How You Can Make Aloo Paratha With Thin Liquid-Like Dough) ट्रिक वापरुन अगदी १० मिनिटांत तयार होणारे आलू पराठे बनवू शकतो. आलू पराठ्यासाठी स्टफिंग न बनवता देखील आपण तितकाच चविष्ट व खमंग आलू पराठा बनवू शकतो. सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या लिक्विड आलू पराठ्याची रेसिपी ही अत्यंत सोपी आहे. नेमकी काय आहे या व्हायरल होणाऱ्या लिक्विड आलू पराठ्याची रेसिपी ते पाहूयात(No stuffing aloo paratha recipe). 

साहित्य :- 

१. उकडलेला बटाटा - २ मोठे बटाटे 
२. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ बारीक चिरलेल्या 
३. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून  
४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
५. हळद - १/२ टेबलस्पून 
६. धणे पूड - १/२ टेबलस्पून 
७. आमचूर पावडर - १ टेबलस्पून 
८. मीठ - चवीनुसार  
९. तीळ - १ टेबलस्पून 
१०. कांदा - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
११. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. गव्हाचे पीठ - २ कप 
१४. पाणी - गरजेनुसार 
१५. तेल - ४ ते ५ टेबलस्पून 
१६. जिरे - १/२ टेबलस्पून 
१७. मोहरी - १/२ टेबलस्पून 
१८. कडीपत्ता - ५ ते ८ पाने 

कुरकुरीत त तरी कांदा भजी मऊ पडतात? सोप्या ४ टिप्स, भजी राहतील कुरकुरीत...


गडबडीत दूध करपले? ६ सोपे उपाय, करपलेल्या दुधाचा ' असा ' करा मस्त वापर...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घ्यावा त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं - लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, हळद,  धणे पूड, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, तीळ, बारीक चिरेलला कांदा, कोथिंबीर, गव्हाचे पीठ आणि गरजेनुसार पाणी घालून डोशासाठी तयार करतो तसे बॅटर तयार करुन घ्यावे. 

२. आता एका छोट्या भांड्यात थोडेसे तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी. ही खमंग फोडणी पराठ्याच्या तयार बॅटरमध्ये घालावी आणि बॅटर व्यवस्थित ढळवून घ्यावे. 
३. त्यानंतर एका पॅनला तेल लावून हे पराठ्याचे तयार बॅटर चमच्याने गोलाकार डोशासारखे पसरवून घ्यावे. त्यानंतर कडांच्या जवळ थोडेसे तेल सोडून हा पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. 

न लाटता, न स्टफिंग करता आपण झटपट तयार होणारा लिक्विड आलू पराठा घरच्या घरी तयार करु शकतो.


Web Title: Liquid Aloo Paratha Aloo Paratha Recipe With Liquid Dough Here’s How You Can Make Aloo Paratha With Thin Liquid-Like Dough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.