थंडीच्या दिवसात क्रिस्पी - चटपटीत खाण्याची इच्छा वारंवार होत असते. जेवणासोबत अथवा सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपण विविध प्रकारचे चिवडे, पकोडे, किंवा सूप ट्राय करतो. आपण भज्यांमध्ये कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी खाल्ली असेल. परंतु, कधी स्पिनच - कांदा भजी खाल्ली आहे का? पालक आणि कांद्याच्या पातीपासून तयार ही भजी चवीला अत्यंत उत्कृष्ट लागते. विंटरला क्रिस्पी बनवण्यासाठी पालक आणि कांद्याच्या पातीला द्या बेसन आणि मसाल्यांचा ट्विस्ट. चला तर मग या पदार्थाची झटपट कृती पाहुयात.
स्पिनच - स्प्रिंग ऑनियन पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बारीक चिरलेली पालक
बारीक चिरलेली कांद्याची पात
४ चमचे तांदळाचं पीठ
बेसन
मीठ
हिरवी मिरची
हळद
लाल तिखट
धणे पावडर
आमचूर पावडर
बारीक चिरलेलं आलं
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये बारीक चिरून घेतलेली पालक आणि कांद्याची पात घ्या. त्यात बेसन, तांदळाचं पीठ, बारीक चिरलेलं आलं, मीठ, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, धणे पावडर, आमचूर पावडर, टाकून सर्व मिश्रण एकत्र करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर गरम तेलात पकोडे तळून घ्या. अशा प्रकारे आपले क्रिस्पी - खमंग स्पिनच - स्प्रिंग ऑनियन पकोडे खाण्यासाठी रेडी.