Join us  

पावभाजी करण्याची बघा ही अतरंगी पद्धत आणि सांगा ओळखू येतंय का, त्यात नेमकं टाकलंय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2022 7:42 PM

Viral Pavbhaji Recipe: तुमची- आमची सगळ्यांचीच आवडीची असणारी पावभाजी बनविण्याची ही कोणती अचाट पद्धत.. बघा हा जबरदस्त व्हायरल व्हिडिओ...

ठळक मुद्देगाड्यावरच्या पावभाजीची सर तर अगदी पॉश, चकाचक हॉटेलच्या पावभाजीलाही नाही, यावरही अनेक जण ठाम असतात. तुमचंही हेच मत असेल तर त्या गाड्यावरच्या भाजीची चव नेमकी कशामुळे येते, ते एकदा बघाच...

भारतात जे काही स्ट्रीटफूड (street food pav bhaji) सगळ्यात आवडीने खाल्ले जातात, त्यात पावभाजी नक्कीच अव्वल आहे. बहुतेक सर्व खवय्यांना पावभाजी आवडतेच. आठवड्यातून एकदा तरी जवळच्या गाड्यावर जायचं आणि भरपेट पावभाजी हाणायची, हा बहुतेकांचा ठरलेला कार्यक्रम असतो. घरी कितीही मेहनत घेऊन पावभाजी केली तरी विकतच्या सारखी आणि स्पेशली एखाद्या गाड्यावरच्या भाजीची चव तिला येतच नाही, हा अनेकांचा अनुभव. गाड्यावरच्या पावभाजीची सर तर अगदी पॉश, चकाचक हॉटेलच्या पावभाजीलाही नाही, यावरही अनेक जण ठाम असतात. तुमचंही हेच मत असेल तर त्या गाड्यावरच्या भाजीची चव नेमकी कशामुळे येते, ते एकदा बघाच... (viral video of making pavbhaji)

 

पावभाजी करण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. कारण बहुसंख्य भारतीय हे पावभाजीचे प्रेमी. म्हणूनच तर आपल्या आवडीची पावभाजी नेमकी कशी तयार केली जाते, हे बघण्याची उत्सूकता प्रत्येकालाच आहे. तुम्हीही पावभाजीचे चाहते असाल तर इन्स्टाग्रामच्या eatwithdelhi या पेजवर शेअर (instagram share) झालेला हा व्हिडिओ एकदा बघाच.. अवघ्या २ दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला १९ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

 

दिल्लीच्या करोल बाग (Delhi, Karol Bagh)  परिसरातील एका गाड्यावर ही पावभाजी मिळते. ५० रुपयाला एक प्लेट असा तिचा रेट आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर एका भल्या मोठ्या कढईत तेल टाकलं. तेल टाकण्याची पद्धतही अतिशय विचित्र. गरम कढईत थेट तेलाच्या पिशव्या टाकल्या. त्या गरम कढईमुळे वितळल्या आणि त्याच्यातलं तेल गळून कढईत परतलं.. ही अजब पद्धत पाहून इथेच भांबावून जाऊ नका. खरी गंमत तर पुढेच आहे. त्यानंतर कांदा आणि इतर इतके वेगवेगळे मसाले या पावभाजीत टाकले जातात की ते बघूनच क्षणभर आपण हैराण होऊन जातो. 

 

एक जण मसाले आणि भाज्या ओतायला तर दुसरा ती भाजी हलवायला.. अशा पद्धतीने ही भाजी बनविण्यात आली. त्यानंतर त्या शेफने ती भाजी भल्या मोठ्या पॅनवर घेतली आणि जशी मागणी येईल, त्याप्रमाणे ती भाजी बटर टाकून गरम करून सर्व्ह केली. आता एवढे वेगवेगळे मसाले आणि पदार्थ या भाजीत पडल्यावर भाजीची चव निश्चितच वेगळी लागणार. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर दिल्लीला गेल्यावर ही पावभाजी खायला विसरू नका. 'घरच्या पावभाजीला विकतच्या पावभाजीसारखी स्पेशल चव का येत नाही?' या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून मिळेल, हे नक्की.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.