आजकाल बहुतेक लोक जेवण पॅक करण्यासाठी प्लास्टिक टिफिन वापरतात. हे हलके असल्याने घेऊन जाण्यास सोपे आहेत, परंतु जेव्हा तेलकट आणि मसालेदार अन्न त्यात ठेवलं जातं तेव्हा ते साफ करणं कठीण होतं. टिफिनवर तेलाचा थर साचतो, जो वारंवार धुतल्यानंतरही जात नाही. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही जास्त प्रयत्न न करता तुमचा टिफिन स्वच्छ करू शकता.
प्लास्टिक टिफिन कसा स्वच्छ करायचा?
लिंबू आणि मीठ
- लिंबू आणि मीठ एकत्र केल्याने तेलाचे डाग आणि चिकटपणा सहज निघून जातो.- अर्धा लिंबू घ्या आणि त्यात थोडं मीठ घाला.- डाग लागलेल्या भागांवर तो घासून घ्या.- काही मिनिटं तसेच ठेवल्यानंतर, कोमट पाण्याने धुवा.- टिफिनचा चिकटपणा आणि वास पूर्णपणे निघून जाईल.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
- बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण टिफिनमधील तेलाचे डाग काढून टाकण्यास मदत करतं.- एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि १ चमचा पांढरा व्हिनेगर मिसळा.- ही पेस्ट टिफिनमध्ये लावा आणि १०-१५ मिनिटं तसंच राहू द्या. आता ते स्पंजने घासून धुवा.
गरम पाणी आणि डिशवॉश लिक्विड
- गरम पाण्याने तेल सहज निघतं आणि टिफिन लवकर स्वच्छ होतो.- टिफिनमध्ये गरम पाणी घाला आणि ५-१० मिनिटं तसेच राहू द्या.- नंतर त्यात डिशवॉश लिक्विड घाला आणि स्पंजने घासून घ्या.
कागदाने डबा पुसून घ्या
- जर टिफिन खूप चिकट असेल तर आधी तेल शोषून घेणं फायदेशीर ठरेल.- टिफिनमध्ये कागदाचा तुकडा ठेवा.- कागद तेल शोषून घेईल, ज्यामुळे टिफिन सहज स्वच्छ होईल.