Lokmat Sakhi >Food > माधुरी दीक्षित सांगतेय तिच्या घरातली कांदाभजीची खास रेसिपी; पावसाळ्यात करा चहा-भजीचा बेत

माधुरी दीक्षित सांगतेय तिच्या घरातली कांदाभजीची खास रेसिपी; पावसाळ्यात करा चहा-भजीचा बेत

Madhuri Dixit shares her special recipe of kanda bhaji : कांदा भजीला क्रिस्पी टेक्स्चर येण्यासाठी त्यात तांदूळाचे पीठ, किंवा कॉर्नफ्लोर घालू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:40 PM2024-07-25T13:40:16+5:302024-07-25T13:45:01+5:30

Madhuri Dixit shares her special recipe of kanda bhaji : कांदा भजीला क्रिस्पी टेक्स्चर येण्यासाठी त्यात तांदूळाचे पीठ, किंवा कॉर्नफ्लोर घालू शकता.

Madhuri Dixit shares her special recipe of kanda bhaji at home Kanda Pakoda Recipe | माधुरी दीक्षित सांगतेय तिच्या घरातली कांदाभजीची खास रेसिपी; पावसाळ्यात करा चहा-भजीचा बेत

माधुरी दीक्षित सांगतेय तिच्या घरातली कांदाभजीची खास रेसिपी; पावसाळ्यात करा चहा-भजीचा बेत

पावसाळा (Monsoon) म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे कांदा भजी (Kanda Bhaji). पावसाळ्यात कांदाभजी खाण्याची मजाच काही वेगळी. नेहमी  बाहेरून कांदाभजी विकत आणण्यापेक्षा घरी कांदा भजी केली तर ती अधिक पौष्टीक आणि टेस्टी लागते. सेलिब्रेटी कितीही डाएट करत असले तरी त्यांनाही अनेकदा भजी खाण्याचा मोह आवरता येत नाही.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने कांदा भजी करण्याची रेसिपी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केली आहे. अगदी सोप्या पद्धतीने कांदाभजी करण्याची माधुरीची पद्धत लोकांना फारच आवडली आहे. (Madhuri Dixit shares her special recipe of kanda bhaji) माधुरी नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करत असते.

पावसाळा आणि कांदाभजी हे समीकरण जुळवत माधुरीने आधी चहा आणि कांदाभजी फेव्हरिट असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर चाहत्यांबरोबर तिची रेसिपी शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीसोबत तिचा मुलगा देखील असतो. आपल्या मुलाशी बोलता बोलती ती कांदाभजीची रेसिपी दाखवते.


कांदाभजी करण्याची योग्य पद्धत कोणती? (How To Make Kandi Bhaji)

सगळ्यात आधी कांदे लांब चिरून घ्या. त्यात अर्धी वाटी बेसनाचं पीठ घाला, पाव वाटी तांदळाचे पीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घाला. पाव टिस्पून लसणाची पेस्ट, बारीक चिरलेल्या मिरच्या, तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्या.  कांदा  भजी करताना कुठेही पाण्याचा वापर करू नका. यामुळे भजीचं टेक्स्चर बिघडू शकते.

कंबर-गुडघ्यांमध्ये वेदना, थकवा येतो? रोज हे २ पदार्थ पाण्यात भिजवून खा, हाडांना ताकद-मासंही वाढेल

या मिश्रणाला भजीचा आकार घेऊन एका ताटात बटर पेपरवर कांद्याचं मिश्रण ठेवून द्या. यानंतर कढईत तेल गरम करण्याासठी ठेवा तेल गरम झाल्यानंतर एका मागोमाग एक कांद्याच्या मिश्रणाचे गोळे घालून कुरकुरीत, खमंग भजी तळून घ्या. चहासोबत तुम्ही कुरकुरीत कांदाभजीचा आस्वाद घेऊ शकता. 

कांद्याची भजी करताना या चुका टाळा (Mistakes Should Avoid While Making Kanda Bhaji)

१) कांदा भजी कुरकुरीत व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यात पाण्याचा एक थेंबही वापरू नका, कांद्याला थोड्यावेळानं पाणी सुटतं. हा ओलसर पण पीठ कालवण्यासाठी पुरेसा असतो.

२)  कांदा भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यात तांदूळाचे पीठ, किंवा कॉर्नफ्लोर घालू शकता.

३) तेल पूर्ण गरम झाल्याशिवाय त्यात भजी सोडून नका, अन्यथा भजी तेल शोषून घेऊल. भजी तळताना नेहमी गॅस उच्च ते मध्यम आचेवर ठेवा. कमी आचेवर भजी तळल्यास कुरकुरीत होणार नाहीत.

४) चव येण्यासाठी भजीच्या पिठात धणे किंवा ओवा घालू शकता. 

Web Title: Madhuri Dixit shares her special recipe of kanda bhaji at home Kanda Pakoda Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.