धक धक गर्ल माधुरी कायम चर्चेत असते. आपला अभियन आणि फॅशन स्टाईलमुळे नेहमीच माधुरी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते. (Madhuri Dixit) माधुरीचे पती श्रीराम नेनेसुद्धा चाहत्यांबरोबर व्हिडिओज शेअर करत असतात. अलिकडेच माधुरीनं शेअर केलेला व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. तिनं पतीसोबत स्वयंपाक करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. माधुरी पोहे कोणत्या पद्धतीनं बनवत असणार याची उत्सुकता अनेक गृहिणींना आहे. (Madhuri Dixit shares scrumptious kanda poha recipe video goes viral again)
अलिकडेच माधुरीनं आईच्या आठवणींना उजाळा देत पोस्ट शेअर केली आहे. सोमवारी माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँणडलवर नवीन पोस्ट शेअर केली. माधुरीच्या या पोस्टमध्ये तिचा आणि आई स्नेहलता दीक्षितचा फोटो आहे. या फोटोसोबत माधुरी दीक्षितने कॅप्शनमध्ये एक लांबलचक नोटही लिहिली आहे. ज्यामध्ये माधुरीने लिहिले आहे की - आज सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला माझ्या आईची खोली रिकामी दिसली, हे वास्तव आहे असे वाटले नाही. तिने आम्हाला जीवन आहे तसे स्वीकारायला शिकवले.
आम्ही त्याची नेहमी आठवण ठेवू. पण ती आमच्या आठवणीत जिवंत राहील. तिची बुद्धी, सकारात्मकता अद्भुत होती. त्यांचे जीवनपर्व आम्ही एकत्र आमच्या आठवणींद्वारे साजरे करू. ओम शांती.
अलिकडेच एका प्रकरणी राजकीय विश्लेषकाने अभिनेत्रीची साथ दिली आहे. राजकीय विश्लेषकाने ‘बिग बँग थिअरी’ शोच्या एक एपिसोडसाठी स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. राजकीय विश्लेषकाने शोमध्ये माधुरीविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला आहे.