गूळ, साखर असं काहीही न घालता कोणता गोड पदार्थ तयार करता येत असेल किंवा अशी कोणती मिठाई असेल जी करण्यासाठी गॅससुद्धा पेटविण्याची गरज नाही.. असे काही प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर एकदा ही एक खास रेसिपी बघाच (Madhuri Dixit's Favourite Mithai).. हा पदार्थ अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने या दोघांचाही आवडीचा आहे. शिवाय हा गोड पदार्थ साखर, गूळ न घालताच तयार होतो (healthy mithai or sweets without sugar and jaggery). त्यामुळे तुमच्या घरातल्या मधुमेह असणाऱ्या तसेच वेटलॉस करत असणाऱ्या मंडळींनाही चालण्यासारखा आहे. या पदार्थाची रेसिपी खुद्द माधुरीनेच सांगितली आहे.
माधुरी दीक्षितच्या आवडीची मिठाई कशी करायची?
माधुरी दीक्षितच्या आवडीच्या ग्रॅनोला बार या पदार्थाची रेसिपी cookwith_gruhini या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. ग्रॅनोला बार हे ब्रिटनमधील एक प्रसिद्ध स्नॅक्स आहे. ते कसे करायचे ते माधुरीनेच एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे.
साहित्य
१ कप बदाम
अर्धा कप पीनट बटर
३ टेबलस्पून मध
२ कप टोस्टेड ओट्स
१० ते १२ खजूर
कृती
सगळ्यात आधी खजुराच्या बिया काढून घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बदाम, खजूर, ओट्स, पीनट बटर आणि मध टाका आणि त्यांची जाडीभरडी पेस्ट करून घ्या.
फार काळजी न घेताही झटपट वाढणारी ६ रोपं, बघा काही दिवसांतच बाग हिरवीगार करण्याचा उपाय
यानंतर एका प्लेटवर बटर पेपर ठेवा आणि त्यावर आपण तयार केलेले मिश्रण टाकून हाताने ते व्यवस्थित थापून घ्या. यानंतर ते फ्रिजरमध्ये ४ ते ५ तासांसाठी ठेवून द्या. माधुरी दीक्षितच्या आवडीचं आणि पौष्टिक असं ग्रॅनोला बार तयार. मुलांनाही चाॅकलेटऐवजी ही मिठाई द्या..