इडली, डोसा, मेदू वडा असे दाक्षिणात्य पदार्थ खाताना त्यासोबतच चटणी लागतेच. चटणीशिवाय असे पदार्थ खाणे अधुरेच आहे. इडली, डोसा, मेदू वडा असे पदार्थ चटणी सोबतच खाण्यात मजा येते. या पदार्थांसोबत आपण चटणी (Chutney Recipe Without Coconut) करताना वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करतो. कधी शेंगदाण्याची तर कधी नारळाची अशा अनेक प्रकारच्या चटण्या केल्या जातात. प्रत्येक घरात या दाक्षिणात्य पदार्थांसोबत खायला केल्या जाणाऱ्या चटण्यांची रेसिपी ही वेगळी असते. मदुराई स्पेशल थन्नी चटणी (Hotel Style Instant Thanni Chutney) ही तमिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील तिखट - गोड - मसालेदार चटणी आहे. ही चटणी मदुराई आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात आणि गाड्यांवर इडली, डोसा, मेदू वडा अशा पदार्थांसोबत दिली जाते(Madurai Thanni Chutney).
मदुराई स्पेशल थन्नी चटणी ही एक लोकप्रिय दक्षिण भारतीय चटणी आहे जी भाजलेली हरभरा डाळ, कांदे, हिरव्या मिरच्या यांसारख्या विविध पदार्थांनी बनविली जाते. या चटणीला त्याची विशिष्ट चव भाजलेल्या हरभऱ्याच्या डाळीपासून मिळते, ज्यामुळे तिला खमंग चव येते. इडली, डोसा, मेदू वडा असे पदार्थ घरी केल्यानंतर त्यासोबत आपण ही मदुराई स्पेशल थन्नी चटणी (Madurai Special Thanni Chutney Recipe without Coconut) करुन खाऊ शकतो. ही चटणी बनवायला सोपी आणि खायला अतिशय चविष्ट असते. मदुराई स्पेशल थन्नी चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात. जर इडली, डोसा, मेदू वडा अशा पदार्थांसोबत नेहमीची तीच ती ओल्या नारळाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ही मदुराई स्पेशल थन्नी चटणी नक्की ट्राय करुन पाहू शकतो(Madurai Special Thanni Chutney Recipe).
साहित्य :-
१. लसूण - ३ ते ४ पाकळ्या २. तेल - ३ टेबलस्पून ३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या४. कांदा - १ कप ५. कडीपत्ता - ५ ते ८ पाने ६. चणा डाळ - १/२ कप (भाजलेली चणा डाळ)७. कोथिंबीर - २ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. पाणी - गरजेनुसार १०. मोहरी - १/२ टेबलस्पून ११. उडीद डाळ - १/२ टेबलस्पून (पांढरी उडीद डाळ)१२. सुक्या लाल मिरच्या - २ ते ३ १३. हिंग - चिमुटभर १४. आलं - २ लहान तुकडे
रात्री उरलेल्या शिळ्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळीही राहतील ताज्या - मऊ, ४ सोप्या टिप्स...
श्रावणात सणावाराला नैवेद्य म्हणून केले जाणारे पंचामृत पिण्याचे फायदे, शरीरासाठी ठरेल वरदान !
कृती :-
१. एका मोठ्या पॅनमध्ये तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आलं, कडीपत्ता, कांदा घालून तेलावर चांगले परतून घ्यावे. २. हे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून झाल्यावर थोडे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर हे सगळे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात ओतावे. ३. तयार करून घेतलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यात भाजून घेतलेली चणा डाळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व पाणी घालून हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये व्यवस्थित पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावेत.
४. आता एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, पांढरी उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या, हिंग, कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. या फोडणीत मिक्सरमध्ये वाटून घेतलेले चटणीचे मिश्रण ओतून चटणीला खमंग फोडणी द्यावी. चटणी हलकेच हलवत राहून २ ते ३ मिनिटे चटणी व्यवस्थित गरम करून घ्यावी.
इडली - डोशासोबत आपण ही मदुराई स्पेशल थन्नी चटणी खाण्यासाठी सर्व्ह करावी.