Lokmat Sakhi >Food > आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी

आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी

Food And Recipe: मॅगीसोबत आता हा आणखी एक प्रयाेग करण्यात आला आहे. काही जणांना ही रेसिपी खूपच आवडली असून तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता (How to make maggi manchurian).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 04:21 PM2022-11-22T16:21:29+5:302022-11-22T16:32:07+5:30

Food And Recipe: मॅगीसोबत आता हा आणखी एक प्रयाेग करण्यात आला आहे. काही जणांना ही रेसिपी खूपच आवडली असून तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता (How to make maggi manchurian).

Maggi manchurian recipe, Yummy and delicious food, How to make maggi manchurian quickly? | आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी

आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी

Highlightsकाही जणांना हा प्रयोग आवडला आहे तर काही जणांनी असे प्रयोग करायला मॅगीचीच निवड का करता, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.

मॅगीसोबत नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. कधी मॅगीचं आईस्क्रिम बनवलं जातं तर कधी मॅगीचं सारण करून त्याचे सामोसे तळले जातात. आता असाच एक मॅगीसोबत केलेला प्रयोग गाजतो आहे. या रेसिपीमध्ये मॅगीचे मन्चुरियन (Maggi manchurian recipe) करून दाखवले आहेत. रेसिपी पाहून तर हा पदार्थ चवदार आणि खमंग असावा, असं वाटतं. काही जणांना हा प्रयोग आवडला आहे तर काही जणांनी असे प्रयोग करायला मॅगीचीच निवड का करता, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. म्हणूनच एकदा तुम्ही स्वत:च mummy_ka_foodie या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेली मॅगी मन्चुरियनची रेसिपी (How to make maggi manchurian) पाहा आणि आवडली तर विकेंडला नक्कीच हा चवदार बेत करा. 

 

कसे करायचे मॅगी मन्चुरियन?
साहित्य

२ कप शिजवलेल्या नूडल्स
सिमला मिरची, गाजर, कांदा, कोबी अशा बारीक चिरलेल्या भाज्या २ कप

डोकं सारखं दुखतं? ६ पदार्थ खाल्ल्यामुळे वाढू शकते डोकेदुखी, वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला
चायनिज सॉसेस
१ टीस्पून व्हिनेगर
मॅगी मसाला
आलं- लसूण- मिरचीची पेस्ट
मिरे पूड
तळण्यासाठी तेल
कॉर्नफ्लॉवर 
चवीनुसार मीठ

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी नूडल्स मसाला न टाकता शिजवून घ्या.

२. उकडलेल्या नूडल्स एका भांड्यात काढा. त्यात चिरलेल्या सगळ्या भाज्या आणि वरील पदार्थ घाला.

Blouse Sleeves Designs: खास नव्या स्टाईलचं, ट्रेण्डी ब्लाउज शिवायचंय? बघा १० आकर्षक डिझाईन पॅटर्न

३. सगळं मिश्रण एकत्र करून व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याचे लहान लहान गोळे बनवा.

४. कढईमध्ये तेल तापवून घ्या आणि त्यात मन्चुरियन तळून घ्या.

५. ग्रेव्ही तयार करण्यासाठी एका कढईमध्ये थाेडं तेल घाला. तेल तापलं की त्यात कांदा आणि सिमला मिरचीचे चौकोनी आकाराचे काप टाकून परतून घ्या.

६. नंतर त्यात आलं- लसूण पेस्ट आणि टोमॅटो सॉस, चिली सॉस, शेजवान सॉस असे तुमच्या आवडीनुसार चायनीज सॉस घाला.

७. थोडं पाणी घाला आणि कॉर्नफ्लेवरची प्युरी टाकून तुम्हाला पाहिजे तसं ते घट्ट करून घ्या.

८. आता या ग्रेव्हीमध्ये तळलेले मन्चुरियन टाका. आणि गरमागरम मॅगी मन्चुरियन सर्व्ह करा. 

 

Web Title: Maggi manchurian recipe, Yummy and delicious food, How to make maggi manchurian quickly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.