मॅगी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ. मॅगी बनवायला अगदी काही मिनिटं लागतात आणि चवीला अप्रतिम असते. त्यामुळे लोकांना मॅगी दिवसभरात कोणत्याही वेळेला खायला आवडते. पावसाळ्यात चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. (Cooking Tips) पण काहीही बनवायचं म्हटलं तरी आधी तयारी करावी लागते आणि त्यात बराचवेळ लागतो म्हणूनच या लेखात कुरकुरीत, कमी वेळात होणारा मॅगी पकोडा कसा तयार करायचा ते सांगणार आहोत. (How to Make Maggi Pakora)
साहित्य
२ पॅकेट मॅगी
१ कप बेसन
१ कप कोर्नफ्लोर
१ चिरलेला कांदा
१ ते दीड हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी किसलेला गाजर किंवा कोबी (आवडीनुसार)
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
मीठ
कृती
सगळ्यात आधी कमी पाण्यात मॅगी मसाला घालून शिजवून घ्या. नंतर एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, गाजर, मीठ घालून ५ मिनिटं बाजूला ठेवा. त्यानंतर त्यात बेसन, कॉर्न फ्लोर, लाल तिखट, हिरवी मिरची, चाट मसाला, गरम मसाला घालून एकजीव करा. (Best Maggi Pakora Recipe) नंतर यात शिजवून थंड केलेली मॅगी घाला मग त्यात चिरलेली कोथिंबीर घाला. गरज वाटल्यास मीठ अजून घाला. नंतर गरमागरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर पकोडे तळून घ्या. हे पकोडे सॉस किंवा पुदीन्याच्या चटणीबरोबर खा. (Maggi Pakora 5 Min recipe)