Join us  

Maggi Parantha : बाबौ! स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवला मॅगी पराठा; पाहा पठ्ठ्यानं हा प्रयोग केला तरी कसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 4:39 PM

Maggi Parantha : रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने पराठा लाटून तव्यावर तेल टाकून सोनेरी-तपकिरी रंगाचा होईपर्यंत शिजवला. त्याने त्यावर थोडे चीज किसले आणि शिजवलेला पराठा प्लेटमध्ये ठेवला

(Image Credit- You Tube)

इंटरनेट चित्र विचित्र पदार्थ बनवणार्‍या लोकांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. आता इंदूरमधील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याचा मॅगी परांठा बनवल्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. आतापर्यंत मॅगी नूडल्स, मॅगी पिझ्झाचे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. हा व्हायरल झालेला व्हिडिओ  फूड ब्लॉगर प्रशांत विजयवर्गीय यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आरजे रोहनने तो पुन्हा शेअर केला. ( Indore street food vendor is selling maggi paratha) 

मॅगी पराठा बनवण्यासाठी आधी त्या माणसाने एका पातेल्यात लोणी टाकले. नंतर त्यात काही भाज्या आणि मसाले टाकले आणि थोडावेळ परतले. पुढे त्याने पाणी, नूडल्स आणि मसाला घालून साधी मॅगी तयार केली. अजून तरी काही बिघडलेलं नाही. पण नंतर त्याने शिजवलेली मॅगी परांठ्याच्या पीठात घालायला सुरुवात केली.

फक्त ५०० रूपयात होईल किचनचा मेकओव्हर; स्टायलिश, नव्या कोऱ्या किचनसाठी या घ्या टिप्स

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने पराठा लाटून तव्यावर तेल टाकून सोनेरी-तपकिरी रंगाचा होईपर्यंत शिजवला. त्याने त्यावर थोडे चीज किसले आणि शिजवलेला पराठा प्लेटमध्ये ठेवला. त्याने या पराठ्यासोबत लोणचं, कांदा, रायता, भाजी करी आणि हिरवी चटणी सर्व्हिंगसाठी दिली.

ऑनलाइन शेअर केल्यानंतर या व्हिडीओला 56 हजार पेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. नेटिझन्सनी या प्रयोगाबद्दल नाराजी व्यक्त केली असून कमेंट्स विभागात चित्र विचित्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :मॅगीमॅगीअन्नपाककृती