Lokmat Sakhi >Food > माघ बिहू म्हणजे वाजणारे ढोल आणि स्नेहाचा फेर, माह कोराई -अमितर खार आणि पिठा

माघ बिहू म्हणजे वाजणारे ढोल आणि स्नेहाचा फेर, माह कोराई -अमितर खार आणि पिठा

मकर संक्रांत स्पेशल : आसाम, देशाच्या ईशान्येतलं सुंदर राज्य आणि तिथला माघ बिहू, मायेनं फेर धरायला शिकवणारा सण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 06:33 PM2024-01-12T18:33:56+5:302024-01-12T18:51:52+5:30

मकर संक्रांत स्पेशल : आसाम, देशाच्या ईशान्येतलं सुंदर राज्य आणि तिथला माघ बिहू, मायेनं फेर धरायला शिकवणारा सण.

Magh Bihu special traditional food in Assam, special food- Makar Sankranti and celebration | माघ बिहू म्हणजे वाजणारे ढोल आणि स्नेहाचा फेर, माह कोराई -अमितर खार आणि पिठा

माघ बिहू म्हणजे वाजणारे ढोल आणि स्नेहाचा फेर, माह कोराई -अमितर खार आणि पिठा

Highlightsमाघ बीहू भारतीय संस्कृतीच्या सर्व समावेशक अंगाचे दर्शन घडवते.

शुभा प्रभू साटम

संक्रांत एकच पण नावे वेगवेगळी. आसाममध्ये संक्रांत माघ बीहू म्हणून साजरी होते. माघ महिन्यातील सण. आसाममध्ये तीन प्रकारचे बिहू असतात त्यातील माघ बिहु. एकसुगीचा हंगाम. नवे पीक, शेतकऱ्याची आर्थिक सुबत्ता, थोडक्यात अगदी कृषीप्रधान उत्सव.
संक्रांत सणात खूप धार्मिक कार्य दिसणार नाही तर हा सण सामाजिक अधिक आणि वैयक्तिक थोडा असा दिसेल. महाराष्ट्रात तिळगुळ देतात असामात एकत्र जमून नाच गाणी होतात. रस्ते शृंगरले जातात. इथे एक गमतीशीर प्रथा असते,आसपासच्या, शेजार पाजारच्या परस बागेतून काही भाज्या फळे चोरायची आणि ती वापरायची.

(Image : google)

 

आपल्याकडे जसे सार्वजनिक नवरात्र अथवा गणेश उत्सव असतो तसच माघ बिहू आसाममध्ये असतो. कोपऱ्याकोपऱ्यावर पारंपरिक पद्धतीने शेकोट्या असतात, रांगोळी काढलेली असते, हार तोरणे लटकत असतात. धुमसणाऱ्या आगीत नवे बटाटे,रताळी भाजली जात असतात,कोणीतरी पारंपरिक ढोलावर ठेका धरत सुर छेडते, लोकांची पावले फेर धरतात,अगदी येणारे जाणारेपण चार पावले नाचतात. माणूस सामाजिक प्राणी आहे हे अशा सणातून जाणवते. आणि कृषी शेती हा समाजाचा कणा आहे हे अधिक पटते. त्यादृष्टीने संक्रांत हा वैयक्तिक कमी आणि सामाजिक अधिक असा सण आहे हे खरे.

(Image : google)

 

काय पदार्थ करतात माघ बिहूसाठी?

१. माघ बीहु मधे एक पदार्थ असतोच तो म्हणजे अमितर खार/खर, केळ्याची साल उन्हात खडखडीत वळवून त्याचे पेय करतात. उत्तर भारतीय कांजी सारखेच. ते पणं याच हंगामात होते. शरीराला काही फायदा व्हावा? आज ज्याला डीटॉक्स म्हणतात ते तसे पेय. किंचित आंबट असे पेय,पन्हे असते तसेच.
२. सण आहे म्हणताना पक्वान्न हवे. आणि इथे तांदूळ गूळ मुबलक. नव्या तांदुळाची घट्टसर खीर होते. जोहा सौलोर पायेश. गूळ पणं ताडाचा नवीन गूळ. नव्या संक्रमणाचा संकेत म्हंजे अशी पक्वान्न. नारळ/खोबरे,गूळ,साखर यांचे लाडू केले जातात. 
३. माघ बीहू दोन दिवस असतो. पहिल्या दिवसला उरुका म्हणतात आणि त्यावेळी पक्वान्ने असतातच पणं अन्य पदार्थदेखील केले जातात.


(Image : google)

 

४. नवे बटाटे,पालेभाज्या,आणि डाळ एकत्र शिजवले जातात.अगदी आपल्या भोगी भाजी सारखे. त्याला तोरकरी लबडा म्हंटले जाते.
५. आसाममध्ये जवळपास पन्नासेक प्रकारचा तांदूळ पिकतो आणि त्या तांदुळाच्या पिठात वेगवेगळे सारण भरून ‘पिठा’ केले जातात. मराठी पातोळ्या असतात तसेच. 

६. माह कोराई म्हणून तिखट प्रकार असतो. चिकट तांदूळ,उडीद डाळ,तीळ,चणे,शेंगदाणे,ओले खोबरे सर्व एकत्र शिजवले जाते. आणि प्रत्येकजण शेजारी पाजारी हा पदार्थ वानोळा म्हणून देतोच. मराठी घरात फराळ देतात किंवा ईदवेळी बिर्याणी त्या सारखेच.
७. कृषी प्रधान सण असल्याने घरातील पशू धनालापणं तांदूळ खीर भरवली जाते.
८. एकूणच माघ बीहू भारतीय संस्कृतीच्या सर्व समावेशक अंगाचे दर्शन घडवते.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Magh Bihu special traditional food in Assam, special food- Makar Sankranti and celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.