Lokmat Sakhi >Food > माघी गणेश जयंती : बाप्पाला दाखवा केशर मावा मोदकांचा नैवेद्य, पाहा झटपट रेसिपी...

माघी गणेश जयंती : बाप्पाला दाखवा केशर मावा मोदकांचा नैवेद्य, पाहा झटपट रेसिपी...

Maghi Ganesh Jayanti: Keshar Mawa Modak Recipe : माघी गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक उकडीचे मोदक करण्यापेक्षा झटपट बनणारे केशर मावा मोदक तयार करून पाहा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 11:55 AM2023-01-25T11:55:44+5:302023-01-25T11:59:20+5:30

Maghi Ganesh Jayanti: Keshar Mawa Modak Recipe : माघी गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक उकडीचे मोदक करण्यापेक्षा झटपट बनणारे केशर मावा मोदक तयार करून पाहा. 

Maghi Ganesh Jayanti: Keshar Mawa Modak... See Quick Recipe... | माघी गणेश जयंती : बाप्पाला दाखवा केशर मावा मोदकांचा नैवेद्य, पाहा झटपट रेसिपी...

माघी गणेश जयंती : बाप्पाला दाखवा केशर मावा मोदकांचा नैवेद्य, पाहा झटपट रेसिपी...

मोदक म्हटलं की गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता पदार्थ. गणपती बाप्पासोबतच आपल्याला सुद्धा मोदक खायला भरपूर आवडतात. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, विविध रंगांचा वापर करून तयार केले जाणारे मोदक विशेष लोकप्रिय आहेत. गणेशोत्सवादरम्यान घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात. हल्ली मिठाईच्या दुकानांमध्येही कित्येक प्रकारचे मोदक उपलब्ध असतात. पण या मोदकांऐवजी घरामध्ये केलेलेच मोदक जास्त चविष्टय लागतात. माघी गणेशोत्सव आपल्यापैकी अनेक जण साजरी करतात. या उत्सवादरम्यान साटोरी, पुरण पोळी, श्रीखंड आणि लाडू यांसारखे पदार्थ सर्रास खाल्ले जातात. पण या सणात मोदकांपेक्षा दुसरा कोणताच पदार्थ इतका लोकप्रिय नाही. आज माघी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जर आपण मोदक बनविण्याचा बेत आखला असेल तर रोजचे पारंपरिक उकडीचे मोदक करण्यापेक्षा झटपट बनणारे केशर मावा मोदक तयार करून पाहा(Maghi Ganesh Jayanti: Keshar Mawa Modak Recipe).


साहित्य :- 

१. मिल्क पावडर - २ कप  
२. दूध - २ कप 
३. साखर - अर्धा कप 
४. केशर - १० ते १५ काड्या  
५. तूप - १ टेबलस्पून  
६. वेलची पूड - १/४ टेबलस्पून (पर्यायी)

सुप्रसिद्ध शेफ संज्योत किर यांनी आपल्या yourfoodlab या इंस्टाग्राम पेजवरून झटपट बनणारे केशर मावा मोदक कसे बनवायचे याचे साहित्य व कृती शेअर केली आहे.

  

कृती :- 

१. एका पॅनमध्ये दूध ओता आता त्यात मिल्क पावडर घाला. (हे करताना गॅस बंद ठेवा. आता चमच्याच्या मदतीने मिल्क पावडर दुधात पूर्णपणे मिक्स करून घ्या. मिल्क पावडरच्या गुठळ्या राहणार नाही, याची काळजी घ्या.)
२. दूध आणि मिल्क पावडरचे मिश्रण संपूर्णपणे एकजीव झाल्यानंतर गॅस मंद आचेवर सुरु करा. 
३. हे मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे शिजवून घ्या. लक्षात ठेवा हे मिश्रण शिजताना त्याला चमच्याने सारखे ढवळत राहा. 
४. मिश्रण शिजत असताना त्यात एक टेबलस्पून तूप, केशर, वेलची पावडर  घालून घ्या. 
५. परत हे मिश्रण थोडे घट्टसर होईपर्यंत सारखे चमच्याच्या मदतीने ढवळत राहा. 

६. आता हे मिश्रण थोडे घट्टसर होत आल्यावर त्यात साखर घाला. 
७. ही साखर त्या मिश्रणात संपूर्ण वितळेपर्यंत ढवळत राहा. 
८. आता हे मिश्रण घट्ट होऊन त्याचा कणकेसारखा एक गोळा तयार होईल. 
९. हे मिश्रण एका डिशमध्ये काढून घ्यावे. मिश्रण थोडे थंड थोडे गरम असेल असे मिश्रण हातावर घेऊन त्याला मोदकाचा आकार द्यावा. (मिश्रण हाताला चिकटत असेल तर हाताला तूप लावून घ्यावे.)
१०. मोदकाचा आकार दिल्यानंतर काटा चमच्याच्या मदतीने मोदकाला पाकळ्यांचा आकार द्यावा. 

झटपट बनणारे केशर मावा मोदक खाण्यासाठी तयार आहेत.   

Web Title: Maghi Ganesh Jayanti: Keshar Mawa Modak... See Quick Recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.