भाजी हा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे. चपाती किंवा भातासोबत खाण्यासाठी भाजी लागतेच. रोजच्या जेवणात आपण ओली आणि सुकी अशा दोन पद्धतीच्या भाज्या बनवतोच. दररोज त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो. दररोजच्या त्याच त्या चवीचा आपल्याला काही वेळाने वैताग येतो. त्यात काहीतरी चेंज हवा असतो तरच जेवणाची मजा वाढते. भाजीच्या चवीत बदल करायचा म्हटलं की त्यात रोजचेच मसाले न वापरता काहीतरी नवीन मसाल्यांचे प्रकार ट्राय केले पाहिजेत(Multi purpose Spice Mix).
मस्त झणझणीत ग्रेव्हीच्या भाज्या करताना आपण त्यात अनेक प्रकारचे सुके मसाले घालतो. या सुक्या मसाल्यांमुळेच भाजीची चव अधिक वाढते. काहीवेळा आपण प्रत्येक भाजीनुसार वेगवेगळे मसाले घालतो. प्रत्येक भाजीनुसार असे वेगवेगळे मसाले घालण्यापेक्षा आपण एकच मसाला तयार करून ठेवू शकतो, आणि तो सगळ्या भाज्यांमध्ये वापरु शकतो. प्रत्येक भाजीसाठी वापरता येईल असा एकच मसाला एकदाच तयार करुन फ्रिजमध्ये ठेवला तर रोजचं काम सोपं होऊ शकत. यासाठी आपण अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा मसाला नेमका कसा बनवायचा याची रेसिपी पाहूयात(Homemade All in One Secret Magic Masala Powder Recipe).
साहित्य :-
१. सुकं खोबरं - १ कप २. चणा डाळ - १ कप ३. खसखस - २ ते ३ टेबलस्पून
तेलाचा थेंबही न वापरता झटपट होणारे ब्रेकफास्टचे ३ सोपे प्रकार, खा पौष्टिक-दिवसभर पुरेल एनर्जी...
पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती...
कृती :-
१. सर्वातआधी सुकं खोबरं घेऊन त्याचे बारीक काप करुन घ्यावेत. २. आता मंद आचेवर कढई ठेवून त्यात सर्वप्रथम चणा डाळ कोरडी भाजून घ्यावी. ३. त्यानंतर त्याच कढईत सुक्या खोबऱ्याचे काप कोरडे भाजून घ्यावेत.
४. सुकं खोबरं हलकेच भाजून झाल्यावर त्यात खसखस घालावी. खसखस आणि सुकं खोबरं एकत्रित भाजून घ्यावे. ५. आता एका डिशमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित काढून थोडे थंड करुन घ्यावेत. ६. सगळे जिन्नस व्यवस्थित थंड झाल्यावर मिक्सरजारमध्ये घालूंन व्यवस्थित बारीक पावडर होईपर्यंत मिक्स करुन घ्यावेत.
आपला मसाला तयार आहे. हा तयार मसाला काचेच्या हवाबंद बरणीत भरुन ठेवावा. हा मसाला आपण ग्रेव्हीच्या भाज्या करताना ग्रेव्ही घट्ट व्हावी आणि चव छान यावी यासाठी वापरु शकतो. मसाला तयार झाल्यावर तो किमान ६ महिने चांगला टिकू शकतो.