Join us  

महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली तर चालते का? उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 11:52 AM

Maha Shivratri 2024 (Maha Shivratrichya upvasala bhagar chalte ka) : उपवास करताना काही सोप्या गोष्टी लक्षात घेतल्या तर उपवासाचा त्रासही जाणवणार नाही.

यंदा ८ मार्चला महाशिवरात्रीचा (Maha Shivratri 2024)  सण साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीच्या  पवित्र दिनी संपूर्ण भारतभरातील लोक खासकरून महादेवाचे उपासक शिवाची मनोभावे आराधना करतात. या दिवशी अनेकजण व्रत-उपवास करतात.  प्रत्येक उपवासाप्रमाणे या उपवासाचेही  काही बेसिक नियम आहेत. (Maha Shivratri Fasting Rules 2024) उपवास करताना काही सोप्या गोष्टी लक्षात घेतल्या तर  उपवासाचा त्रासही जाणवणार नाही.

महाशिवरात्रीच्या उपवासाला काही पदार्थांचे सेवन करणं टाळायला हवं. काहीजण दूध, फळांचा आहार घेऊन हा उपवास करतात तर काहीजण फक्त पाण्याचे सेवन करतात. महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली तर चालते का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल हा उपवास कसा करावा ते समजून घेऊ. ( Maha Shivratri Fasting Rules)

महाशिवरात्रीच्या उपवासाला बहुतेक लोक वरीचा भात खाणं टाळतात. भगर न खाता तुम्ही आहारात दूध, फळं, अंजीर, काजू, बदाम,  शेंगदाण्यांचा हलवा, शिंगाड्याचे पीठ, खजूर, थालिपिठ, साजूक तुपाचे लाडू या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

दूध प्यायची सवयच नाही-कॅल्शियम कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना मिळेल भरपूर कॅल्शियम

आहारातज्ज्ञांच्यामते वरीच्या भातात फायटिक एसिड कमी असते. फायटिक एसिड शरीरातल मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारख्या खनिजांच्या अवशोषणा बाधा आणते. वरीचा भात खाल्ल्याने तुम्हाला फळं किंवा इतर पौष्टीक पदार्थ खाण्याइतकेच फायदे मिळू शकतात. पोषणतज्ज्ञ सांगतात की असा भात फायबर्सयुक्त असतो.

महाशिवरात्र स्पेशल : पाहा १० सुंदर आकर्षक रांगोळ्या - चटकन काढता येतील अशा झटपट डिझाइन्स

भगर आयर्नने परिपूर्ण असते उपवासाच्या दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी याचे सेवन केल्यानं शरीरातील आयर्नची कमतरता पूर्ण होण्यास मदत  होते. अनिमियाने त्रस्त असलेल्यांना लोकांनी आपल्या आहारात या भाताचा समावेश करायला हवा.

ज्यात जास्तीत जास्त प्रमाणात सोल्युबल आणि अन्सोल्युबल फायबर्सचे अंश असतात.  महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही उपवासाचे पदार्थ खात असाल तर ते जास्त प्रमाणात खाऊ नका. संयमाने काही पदार्थांचे सेवन करा. मखान्यांचे सेवन करा हेल्दी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.

जेणेकरून दीर्घकाळ भूक लागणार नाही. कॅलरीज कमी असल्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. वजन नित्रंणात राहण्यास मदत होते. वरीचे तांदूळ प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. शरीरात ७५ कॅलरीज, १.५ ग्राम प्रोटीन्स असतात. 

टॅग्स :महाशिवरात्रीअन्न