Join us  

Maharashtra Day 2022 : रोज तेच तेच खाऊन कंटाळलात? ट्राय करा १० सोपे मराठमोळे पदार्थ; या घ्या झटपट चविष्ट रेसेपीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 1:15 PM

Maharashtra Day 2022 : सणासुदीला, रोजच्या जेवणाची चव वाढवायला किंवा पाहूणचारासाठी तुम्ही या १० पैकी कोणतेही पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यात बनवू शकता.

रोज आपण कितीही फास्ट फूड किंवा जंक फूड खात असलो तरी महाराष्ट्रीयन पारंपारीक पदार्थांची मजाच काही वेगळी. गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातही भारतातील पारंपारीक पदार्थ आवडीने खाल्ले जात आहेत. (Maharashtra day 2022) आज महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही तुम्हाला सोप्या रेसेपीज दाखवणार आहोत. सणासुदीला, रोजच्या जेवणाची चव वाढवायला किंवा पाहूणचारासाठी तुम्ही या १० पैकी कोणतेही पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यात बनवू शकता. (10 best maharashtrian recipes easy to make maharashtrian recipes)

१) पुडाची वडी

पुडाची वडी हा विदर्भ खाद्यसंस्कृतीतील पारंपारिक पदार्थ आहे. ज्यामध्ये बेसनाचा समावेश असतो ज्यामध्ये मसाले, खसखस ​​आणि खोबरं मिसळलेले असते कांदा-कोथिंबीरच्या मिश्रणाने या वड्या भरल्या जातात.

२) बटाटा वडा

कमी पैश्यात संपूर्ण मुंबईची भूक भागवणारा वडापाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. बटाटे वडे बनवायला सोपे आणि खायला चमचकीत, स्वादिष्ट लागतात. बटाटेवडे तयार करण्यासाठी आधी मसाले घालून उकडेल्या बटाट्याचे स्टफिंग तयार करून घ्यावे लागते. त्यानंतर बेसनाच्या पीठात घोळवून बटाटेवडे तळे जातात. 

३) झुणका भाकरी

झुणका चण्याचं पीठ कढीपत्ता, आले-लसूण पेस्ट, जिरे आणि मोहरीसह बनवला जातो. समृद्ध आणि सुगंधी, बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसह झुणका सर्व्ह केला जातो.

४) पाव भाजी

महाराष्ट्राचा पारंपारिक हिट असा पदार्थ म्हणजे पाव भाजी. सगळ्या भाज्या शिजवून घेतल्यानंतर पावभाजी हा बनवायला सोपा आणि खायला चविष्ट पदार्थ लगेच बनून तयार होतो

५) पुरणपोळी

महाराष्ट्रात पुरणपोळी खास प्रसंगाना घरोघरी बनवली जाते. गव्हाच्या आणि मैद्याच्या पीठाच्या आवरणात चण्याची डाळ आणि गुळ घातलेलं सारण घालून पुरणपोळी केली जाते.  पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजून घ्यावी.

६) मोदक

महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मिष्टान्न जे गणेश चतुर्थीच्या सणामध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. मोदक आता देशाच्या अनेक भागांमध्ये बनवले जातात. नारळ, गूळ, जायफळ आणि केशर भरलेले गोड पिठाचे एक डंपलिंग असते. 

७) घावणे

डोसा सारखी डिश जी तुम्ही फक्त तीन घटकांसह काही मिनिटांत बनवू शकता! तांदूळ आणि मीठ घालून बनवलेला, घावन हा एक पारंपारिक महाराष्ट्रीयन नाश्ता आहे.

८) आमटी

हरभरा डाळ किंवा तूर डाळ मसाले, कढीपत्ता आणि विशेष महाराष्ट्रीयन गोडा मसाल्याचा अतिरिक्त डोस घालून आमटी तयार केली जाते. 

९) भरलेली वांगी

वांगीची भाजी आणि भरीत यापेक्षा वेगळा आणि तितकाच चविष्ट प्रकार म्हणजे भरलेली वांगी, भरलेली वांगी मोठ्या वांग्यांमध्ये मसाले भरून तयार केली जातात. 

१०) सोलकढी

नारळ, कोकम वापरून सोलकढी तयार केली जाते. उन्हाळ्यात सोलकढीशिवाय जेवणच अपूर्ण असल्यासारखे आहे. 

टॅग्स :अन्नपाककृतीभारतीय उत्सव-सण