Lokmat Sakhi >Food > नाव लबाड पण चव भन्नाट, पाहा पारंपारिक 'लबाड वांगे' करण्याची झणझणीत रेसिपी..

नाव लबाड पण चव भन्नाट, पाहा पारंपारिक 'लबाड वांगे' करण्याची झणझणीत रेसिपी..

Maharashtra special labad vange : भरली वांगी, वांग्याचं भरीत नेहमीच खातो, पण लबाड वांगी ही रेसिपी करुन तर पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2024 12:58 PM2024-02-09T12:58:07+5:302024-02-09T12:59:00+5:30

Maharashtra special labad vange : भरली वांगी, वांग्याचं भरीत नेहमीच खातो, पण लबाड वांगी ही रेसिपी करुन तर पाहा..

Maharashtra special labad vange | नाव लबाड पण चव भन्नाट, पाहा पारंपारिक 'लबाड वांगे' करण्याची झणझणीत रेसिपी..

नाव लबाड पण चव भन्नाट, पाहा पारंपारिक 'लबाड वांगे' करण्याची झणझणीत रेसिपी..

महाराष्ट्रात वांगी खाण्याचा खवय्यावर्ग तसा फार मोठा नाही. पण वांग्याची भाजी, भरली वांगी, वांग्याचं भरीत, वांग्याची भजी यासह इतर पदार्थांमध्ये वांग्याचा वापर आपण करतो, आणि चवीने खातो. वांगी खाल्ल्याने आरोग्याला फायदाच होतो. पण तरीही बरेच जण वांग्याचे पदार्थ खाताना नाकं मुरडतात (Brinjal). वांग्याचे नानाविध प्रकार आपण खाल्ले असतील, पण कधी लबाड वांगी हा पदार्थ करून पाहिलं आहे का?

आता तुम्ही म्हणाल नावातच लबाड आहे, तर खायला हा पदार्थ कसा असेल? लबाड वांगी हा पदार्थ तसा फार जुना, जर आपल्याला रोजचे वांग्याचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा लबाड वांगी हा पदार्थ करून पाहा (Cooking Tips). आपल्याला ही हटके रेसिपी नक्कीच आवडेल(Maharashtra special labad vange).

लबाड वांगे करण्यासाठी लागणारं साहित्य

काटेरी छोटी वांगी

ओवा

ब्रेड क्रम्स

आलं - लसूण पेस्ट

बटाटे

मेदूवड्याचं पीठ सैल झालं, तेलात सोडताना वड्याचा आकार बिघडतो? ३ टिप्स- मेदूवडा होईल परफेक्ट कुरकुरीत

गरम मसाला

हळद

धणे पूड

लाल तिखट

मीठ

कोथिंबीर

बेसन

बेकिंग सोडा

कृती

सर्वप्रथम सुरीने वांग्याच्या मधोमध चीर पाडून घ्या, नंतर पाण्याने धुवून घ्या. वांगी धुतल्यानंतर एका भांड्यात काढून ठेवा. त्यात एक कप पाणी घाला, आणि भांडं प्रेशर कुकरमध्ये ठेवा. झाकण लावून ३ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा, व भांडं बाहेर काढा. वांगी शिजल्यानंतर देठ पकडून वांग्याचा गर अलगद हाताने काढून एका बाऊलमध्ये काढून घ्या.

एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा आलं-लसूण पेस्ट घालून भाजून घ्या. आलं-लसूण पेस्टचा रंग बदलल्यानंतर त्यात वांग्याचा गर, दोन उकडलेले बटाटे, अर्धा चमचा गरम मसाला, चिमुटभर हळद, एक चमचा धणे पूड, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साहित्य मिक्स करा.

तुरीचे वरण खातो पण डोसा? खा तूरडाळीचा पौष्टिक डोसा - पीठ न आंबवता करा झ्टपट डोसे

साहित्य एकजीव झाल्यानंतर त्यात २ चमचे ब्रेड क्रम्स घाला. जेणेकरून सैल झालेलं मिश्रण घट्ट होईल. दुसरीकडे एका बाऊलमध्ये बेसनाचे बॅटर तयार करा. यासाठी त्यात २ कप बेसन, एक चमचा धणे पूड, एक चमचा ओवा, एक चमचा लाल तिखट, २ चिमुट बेकिंग सोडा, चमचाभर गरम तेल आणि पाणी घालून मिक्स करा. ज्याप्रमाणे आपण भजी तयार करण्यासाठी बॅटर तयार करतो. त्याचप्रमाणे बॅटर तयार करा.

आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचा गोळा तयार करा. तयार गोळा वांग्याच्या देठामध्ये बसवून घ्या, आणि गोळ्याला वांग्याचा आकार द्या, आणि बेसनात बुडवून हलक्या हाताने तेलात सोडा. मध्यम आचेवर वांगी तळून घ्या. अशा प्रकारे लबाड वांगी खाण्यासाठी रेडी. 

 

Web Title: Maharashtra special labad vange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.