बटाट्याची भाजी ही कोणत्याही खास प्रसंगासाठी किंवा रोजच्या जेवणासाठीसुद्धा उत्तम ऑपश्न आहे. (Cooking Hacks) बटाट्याची भाजी बनवायचं म्हटलं की ते शिजवा, बटाट्याचे काप करा या सगळ्यात बराचवेळ जातो. बटाट्याची भाजी बनवण्याासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीनं ही भाजी बनवू शकता. झटपट बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. (How to make potato bhaji) रक्षाबंधनाच्या दिवशी पुरीबरोबर खाण्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता. (Batata Bhaji Recipe)
1) सगळ्यात आधी उकडून सालं काढून घेतलेले बटाटे एका जाळीवर ठेवून व्यवस्थित भाजून घ्या. मग एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, मिरची, कोथिंबीर घालून वाटण तयार करून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवून त्यात मोहोरी, जीरं आणि मिरचीचे वाटण घाला.
2) त्यात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला वरून मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. त्यात हळद, गरम मसाला आणि वाटण घालून मिक्स करा. व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात कुस्करलेला बटाटा घाला.
3) कुस्करलेल्या बटाट्यात कोथिंबीर घालून मिश्रण चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्या. तयार आहे गरमागरम बटाट्याची भाजी. ही भाजी तुम्ही पुरी, चपाती किंवा भाकरी, पराठा आणि डोश्याबरोबरही खाऊ शकता.
बटाट्याचा रस्सा कसा बनवावा?
1) बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक कढई घ्या. त्यात तेल घालून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी घाला. मोहोरी तडतडल्यानंतर त्यात जीरं, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट आणि हिंग घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर उकळेल्या बटाट्याचे तुकडे कढईमध्ये घाला आणि ३ ते ४ मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्या.
2) आता त्यात एक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ, १ टिस्पून साखर घालून ३ ते ४ मिनिटं शिजवा. त्यानंतर यात लाल मिरची पावडर आणि हळद घालून भाजी व्यवस्थित शिजवा. १ मिनिटं पूर्ण शिजल्यानंतर त्यात सव्वा कप पाणी घाला आणि मध्यम आचेवर भाजी शिजू द्या. जेव्हा भाजी पूर्ण शिजेल तेव्हा गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवून कढईवर झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी शिजवा.
3) भाजी शिजवताना मध्येमध्ये चमच्याच्या मदतीने तपासत राहा. बटाट्याची भाजी पूर्ण शिजायला १५ मिनिटं लागू शकतात. भाजी शिजवताना थोडं पाणी घालावसं वाटतं तर त्यात घाला. नंतर त्यात धणे पावडर घालून व्यवस्थित एकजीव करा. तयार आहे बटाट्याची रस्सा भाजी. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा पुरीसोबतही खाऊ शकता.