जेवताना वरण भात किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी ठेचा किंवा चटण्या असतील तर जेवणाची मजाच काही वेगळी असते. मिरच्या सर्वांच्याच स्वयंपाकघरात असतात.(Maharashtrian Hirvya Mirchicha Thecha) लांब-जाड मिरच्यांचा ठेचा बनवायला अगदी सोपा असतो आणि ५ ते १० मिनिटांत बनून तयार होतो. विशेष म्हणजे ठेचा बनवण्याची योग्य पद्धत वापरली तर आठवडाभर ठेचा चांगला राहतो. (Cooking Tips)
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही ठेचा खाऊ शकतं. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते आणि जिभेला चवसुद्धा येते. मिरचीमध्ये आजारांशी लढणारे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे आहारात मिरचीचा समावेश करावा असं म्हटलं जातं. पण तिखट चवीमुळे मिरची खाणं लोक टाळतात किंवा कोणत्याही पदार्थातील मिरच्या बाजूला काढून मग खातात. (Maharastrian Green Chilli Thecha Recipe)
जर तुम्ही ठेचा बनवला तर या माध्यमातून मिरची शरीरात जाईल. जर तुमच्या घरी जास्त तिखट खाल्लं जात नसेल तर तुम्ही बारीक मिरच्या न घेता पोपटी रंगाच्या जाड मिरच्या घेऊ शकता. या मिरच्या कमी तिखट असतात. ठेचा बनवताना पाव टिस्पून साखर घाला. ज्यामुळे ठेचा जास्त खाल्ला तरी एसिडीटी किंवा जळजळ असे त्रास उद्भवत नाहीत. अस्सल गावरान पद्धतीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहूया.
१) ठेचा बनवण्यासाठी सगळ्यात आधी योग्य मिरचीची निवड करा. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर बारीक हिरव्या मिरच्या घ्या. पण जर जास्त तिखट चव नको असेल तर पोपटी जाड हिरव्या मिरच्या घ्या. मिरच्या धुवून व्यवस्थित पुसून घ्या.
२) एक तव्यात किंवा कढईत तेल गरम करून त्यात धुवून पुसून घेतलेल्या मिरच्या घाला, त्यात लसूण, जीरं, मीठ घालून परतवून घ्या. मिरच्या भाजत असताना चमच्याने ढवळत राहा. मिरच्यांवर काळे डाग पडू लागले की त्यात भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर घाला.
३) हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर खलबत्त्यात काढून बारीक वाटून घ्या. वेळ कमी असल्यास तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता. तयार आहे गावरान झणझणीत ठेचा. भाकरी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
४) या ठेच्यामध्ये तुम्ही बेसनाचं पीठ घालू शकता. यामुळे तिखटपणा कमी होईल आणि चवही अप्रतिम होईल.