Lokmat Sakhi >Food > ना तेल-ना पाण्याचा एक थेंब; अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून करा गावरान वाटण; भाजी होईल चमचमीत

ना तेल-ना पाण्याचा एक थेंब; अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून करा गावरान वाटण; भाजी होईल चमचमीत

Maharashtrian Kanda lasun Vatan/Garlic Coconut Curry Base : सुकं खोबरं आणि लसणाची करा आठवडाभर टिकणारे वाटण; चव भन्नाट-करा १० मिनिटात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 11:29 AM2024-03-22T11:29:18+5:302024-03-22T17:06:42+5:30

Maharashtrian Kanda lasun Vatan/Garlic Coconut Curry Base : सुकं खोबरं आणि लसणाची करा आठवडाभर टिकणारे वाटण; चव भन्नाट-करा १० मिनिटात..

Maharashtrian Kanda lasun Vatan/Garlic Coconut Curry Base | ना तेल-ना पाण्याचा एक थेंब; अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून करा गावरान वाटण; भाजी होईल चमचमीत

ना तेल-ना पाण्याचा एक थेंब; अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून करा गावरान वाटण; भाजी होईल चमचमीत

प्रत्येक गृहिणीचा रोजचा प्रश्न, 'आज भाजीला काय बनवू?' प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. पण जर चमचमीत-चविष्ट भाजी खायची असेल तर, त्यात वाटणचा वापर केलाच जातो (Maharashtrian Recipe). विविध भागात विविध प्रकारचे वाटण तयार केले जातात. कुठे खोबरं भाजून, तर कोणी ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार करतात. पण हे वाटण अधिक काळ फ्रिजमध्ये साठवून ठेवल्यास टिकत नाही.

जर आपल्याला रोजच्या वापरण्यात येईल अशा प्रकारचे वाटण तयार करून ठेवायचं असेल तर, या रेसिपीत दिलेल्या टिप्स फॉलो करून पाहा (Cooking Tips and Tricks). या टिप्सच्या मदतीने भाजीचे चव वाढवणारे वाटण तयार होईल (Kitchen Tips). शिवाय स्टोर करून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकेल. खोबऱ्याचं वाटण कसं तयार करायचं पाहूयात(Maharashtrian Kanda lasun Vatan/Garlic Coconut Curry Base).

भाजीची चव वाढवणारे चविष्ट खोबऱ्याचं वाटण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

सुकं खोबरं

जिरं

हॉटेलस्टाइल परफेक्ट मोकळा जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी, घरीच करा १५ मिनिटांत

लसूण

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एक वाटी सुकं खोबऱ्याला भाजून घ्या. गॅसच्या लो फ्लेमवर सुकं खोबरं दोन्ही बाजूने भाजून घ्या. खोबऱ्याची वाटी भाजून घेतल्यानंतर सुरीने त्याचे बारीक काप तयार करा.

उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

आता पाट्यावर भाजकं जिरं घेऊन वरवंट्याने बारीक पावडर तयार करून घ्या. आता त्यावर ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या ठेऊन ठेचून घ्या. नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबऱ्याचे काप घालून ठेचून घ्या.

नंतर वरवंट्याने त्याचे वाटण तयार करा. जर आपल्याकडे पाटा वरवंटा नसेल किंवा त्यावर वाटण तयार कसे तयार करायचं हे माहित नसेल तर, मिक्सरमध्ये वाटून आपण वाटण तयार करू शकता. अशा प्रकारे सुकं खोबऱ्याचं वाटण रेडी. आपण या वाटणाचा वापर विविध भाज्या करण्यासाठी करू शकता. यामुळे भाजीची चव नक्कीच वाढेल.

Web Title: Maharashtrian Kanda lasun Vatan/Garlic Coconut Curry Base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.