Join us  

कांदा, लसूण आणि आलं न घालताही कटाची आमटी करता येते? पाहा झणझणीत आमटीची सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2024 1:01 PM

Maharashtrian Katachi Amti, Without Onion and Garlic : पुरणपोळीच कशाला? भात आणि चपातीसह देखील झणझणीत कटाची आमटी चविष्ट लागते..

महाराष्ट्रात प्रत्येक पदार्थाला काही ना काही महत्व आहे. सणावाराला आपण पुरणपोळीसोबत कटाची आमटी देखील करतो. शिवाय श्रीखंड पुरीचा देखील बेत आखतो (Cooking Tips). पण बहुतांश जणांना पुरणपोळीसोबत कटाची आमटी खायला आवडते. पण फक्त पुरणपोळीच का? आपण चपाती किंवा भातासह देखील कटाची आमटी कधीही तयार करून खाऊ शकता (Katachi Amati).

जर आपल्याला कटाची आमटी खाण्याची इच्छा झाली असेल, शिवाय कांदा -लसूण आपण खात नसाल किंवा खायला आवडत नसेल तर, एकदा ही रेसिपी पाहा (Maharashtrian Dish). कांदा, लसूण आणि आलं न घालता आपण झणझणीत कटाची आमटी तयार करू शकता. शिवाय ही आमटी फक्त पुरणपोळीसोबत नसून, चपाती आणि भातासह देखील खाऊ शकता(Maharashtrian Katachi Amti, Without Onion and Garlic).

कांदा, लसूण आणि आलं न घालता करा कटाची आमटी

लागणारं साहित्य

सुकं खोबरं

तेल

खसखस

जिरे

पांढरे तीळ

धणे

भूक लागली? कपभर गव्हाचं पीठ-२ कांद्याचे करा झटपट कांदा पराठा; १० मिनिटात डिश रेडी

कोथिंबीर

कडीपत्ता

लाल तिखट

हळद

गरम मसाला

गोडा मसाला

मीठ

कृती

सर्वप्रथम, लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल घाला. तेलात खोबऱ्याचे तुकडे घालून भाजून घ्या. खोबऱ्याच्या तुकड्यांचा रंग ब्राऊन झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर तव्यावर ३ चमचे खसखस घालून भाजून घ्या. मग एक चमचा जिरं, पांढरे तीळ आणि धणे भाजून घ्या. भाजलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून साहित्य वाटून घ्या.

ना उडीद डाळ -ना सोडा; १५ मिनिटात करा इन्स्टंट मेदू वडे; ऑथेटिंक चव, क्रिस्पी वडे

दुसरीकडे एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात कडीपत्ता, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा गोडा मसाला घालून मिक्स करा. मसाले तेलात भाजून झाल्यानंतर त्यात वाटण घालून मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. जोपर्यंत भाजलेल्या मसाल्यामधून तेल सुटत नाही, तोपर्यंत भाजून घ्या.

भाजलेल्या मसाल्यामधून तेल सुटल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात शिजवलेल्या चणा डाळीचं पाणी घालून मिक्स करा. मध्यम आचेवर आमटी ५ ते ७ मिनिटांसाठी शिजवून घ्या. आमटीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून आमटी चपाती, पुरणपोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स